म्हाडा  सोलापूर महानगरपालिका व रे नगर यांच्यात  त्रिपक्षीय घनकचरा व्यवस्थापनाचा करार

त्रिपक्षीय करार
त्रिपक्षीय करार

म्हाडा  सोलापूर महानगरपालिका व रे नगर यांच्यात  त्रिपक्षीय घनकचरा व्यवस्थापनाचा करारग

रे नगरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचे पूर्ण सहकार्याची ग्वाही  आयुक्त शीतल तेली-उगलेंनी दिली

सोलापूर दि.४:- घन कचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे. घन कचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर इ. बाबी घन कचरा व्यवस्थापनात येतात. हे करीत असताना परिसराचे सौंदर्य व स्वास्थ्य टिकेल आणि आर्थिक दृष्टया परवडेल अशा पद्धती अवलंबने आवश्यक आहे. जगातील एकमेव असे महत्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प रे नगर या अभिनव अशा सुंदर नगरीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी रे नगर, म्हाडा आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत तुळजापूर रोड येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सदर च्या घनकचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. शीतल तेली-उगले यांनी दिली.
गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी सोलापूर महानगरपालिका मा. आयुक्त कार्यालय येथे रे नगर, म्हाडा आणि महानगरपालिका यांच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करार मा.आयुक्त शीतल तेली- उगले सोमपा व रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सोलापूर महानगर पालिकेकडून मा. उपायुक्त मच्छिंद्र घोलप, म्हाडाकडून उप अभियंता मा. मिलिंद अटकळे, रे नगर कडून अध्यक्ष मा. नलिनीताई कलबुर्गी, सचिव युसुफ शेख (मेजर) यांनी घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी आडम मास्तर म्हणाले की, पर्यावरणीय स्वच्छता राखण्यासाठी आणि शाश्वत तसेच राहण्यायोग्य शहरे निर्माण करण्यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे खरोखर आवश्यक आहे. त्यामुळे, कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरणाला लाभ देणारी चांगली कार्यप्रणाली आवश्यक आहे.
कोणत्याही प्रदेशात, कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी आणि त्यामुळे होणारे कोणतेही आरोग्य धोके टाळण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.अशी व्यवस्था रे नगर चे लाभार्थी करतील अशी आशा व्यक्त केले.यावेळी मा. नगरसेविका कामिनी आडम ,अभियंता मेहुल मूळे, संदीप झाकणे, गजेंद्र दंडी ॲड.अनिल वासम, विरेंद्र पद्मा,बाळकृष्ण मल्याळ,सनी शेट्टी,नागेश म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *