5000 per tonne for sugarcane and compensation for crop damage | शेतकरी संघटनेची मागणी

उसाला प्रतिटन ५हजार दर व पीक नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकरी संघटनेची मागणी

   शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  1. शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर  30 ऑक्टोबर,

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला.

ऊसाला प्रति टन पाच हजार रुपये दर जाहीर करून, दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करा. पिकविम्याची नुकसान भरपाई तात्काळ द्या. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा. आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना चर्चा करून देण्यात आले, त्यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सचिन आगलावे, रघुनाथ पाटील शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव बाळासाहेब वाळके, जिल्हाध्यक्ष रामभाऊ सारोडे, संभाजी ठोंबरे, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ता राहुल बिडवे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अख्तराज पाटील, प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बारंगुळे, वैशाली ढगे, हनुमंत भोसले, दत्तात्रय फराडे, सुधाकर गुजरे, सिद्धाराम काकणकी, सुधीर खाडेकर आदींसह जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. मागण्यांची पूर्तता दहा दिवसात न झाल्यास संबंधित सर्व कार्यालयावरती तीव्र स्वरूपाची आंदोलन करणार असल्याचे यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी सांगितले.

 

फोटो ओळी:- छायाचित्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व इतर प्रतिनिधी दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *