सत्ताकारण न्युज नेटवर्क टीम
Dutee Chand Doping Issue : एशियन गेम्समध्ये दोनवेळा रौप्य पदक पटकावणारी भारताची धावपटू दुती चंद उत्येजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. यानंतर दुती चंदने या प्रकरणात ओडिसा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आपली मदत करावी अशी विनंती केली आहे. (Dutee Chand Cancer)
राष्ट्रीय उत्येजक द्रव्य विरोधी संस्थेने (NADA) चंदवर चार वर्षाची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोन डोपिंग टेस्टमध्ये चंदच्या रक्ताच्या नमुन्यात बंदी असलेलं उत्येजक द्रव्य सापडले होते. त्यानंतर तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.
या कारवाईनंतर दुती चंदने एएनआयला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘मला बंदीची बातमी काल सकाळी कळाली. मी निर्णयाला आव्हान दिलेली केस हरली आणि माझ्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. मला या निर्णयामुळे धक्का बसला तसेच खूप दुःख देखील झाले.’
Dutee Chand ‘मी यापूर्वी देखील अनेक डोपिंग टेस्ट दिल्या आहेत. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. मी राज्य आणि केंद्र सरकारला तसेच नाडाला (NADA) मदतीसाठी विनंती केली आहे. मला विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करण्यात यावी अशी विनंती मी केली आहे. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही.’
नाडाने घातलेली बंदी ही या वर्षी 3 जानेवारी पासून लागू होणार आहे. दुतीच्या रक्ताचे नमुने हे 5 डिसेंबरला घेण्यात आले होते. या काळात पात्र झालेल्या स्पर्धांमधून तिला अपात्र करण्यात आले आहे. तिने मिळवलेली सर्व पदके, गुण आणि बक्षीसं देखील काढून घेण्यात येणार आहे.
Dutee Chand ने सांगितले की तिला डॉक्टरांनी स्टेज 1 चा कॅन्सर झाला असल्याचे कळवले. तिने खेळातून निवृत्ती घेण्याची गरज आहे असेही डॉक्टरांचे मत आहे.
दुती म्हणाली की, ‘माझ्या आयुष्यात जे काही होत आहे ते पाहून मी खूप घाबरले आहे. मी एमआरआय स्कॅन केला त्यावेळी डॉक्टरांनी मला स्टेज 1 चा कॅन्सर असल्याचे सांगितले. मी वेदना कमी होण्यासाठी काही औषधे घेत होते. मला ही औषधे उत्येजक द्रव्य असल्याचे माहिती नव्हते.’
27 वर्षाची दुती म्हणते की, ‘माझ्या वकिलांनी माझा बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. माझ्या मते भारतात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूवर 4 वर्षाची बंदी घालण्यात आलेली नाही. मला या निकालाविरूद्ध दाद मागण्यासाठी 21 दिवासांचा कालावधी मिळाला आहे. मी पुन्हा एकदा दाद मागणार आहे.’
Check Next