Chandrayaan-3 | भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रयान-3 चं 14 जुलैला यशस्वी प्रक्षेपण केलं. 23 ऑगस्टला हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. त्यानंतर या यानातलं विक्रम लँडरही यशस्वीरित्या बाहेर पडलं. आता हे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे जाईल. या क्षणाची सगळ्या देशाला आतुरता आहे.
पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असणाऱ्या मातीची शास्त्रज्ञांना गरज होती. कारण विक्रम लँडर जिथे उतरणार आणि जिथे जाणार त्या पृष्ठभागाची प्रतिकृती तयार करून चाचणी घ्यायची होती. त्या प्रकारची माती फक्त एकच ठिकाणी सापडते. तामिळनाडूतल्या नामक्कल जिल्ह्यात. या मातीची कहाणी जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल.
1950 च्या सुमारास नामक्कल जिल्ह्यातल्या चित्तमबोंडी आणि गुन्नामलाई भागात एनोर्थसाईट प्रकारचे खडक आढळून आले. चंद्रचा पृष्ठभागही याच एनोर्थसाईट प्रकारच्या खडकांनी बनला आहे.
Chandrayaan-3
अर्थात 1950 साली या भागात जो अभ्यास करण्यात आला त्याचा चंद्रयानाशी काही संबंध नव्हता. एनोर्थसाईट प्रकारच्या खडकांनी चंद्र बनला त्याच सुमारास पृथ्वीवर तयार झाली. अभ्यासकांनी या खडकांमध्ये आढळणाऱ्या क्षारांचा अभ्यास केला आहे. पण सत्तरच्या दशकात अमेरिकेने अपोलो चंद्र मोहिमा राबवल्या. त्यातून पुढे आलेल्या माहितीतून समजलं की चंद्रावरही एनोर्थसाईट खडक आणि बेसॉल्ट मातीने बनलेले खडक आहेत.
भारतात चंद्रयान मोहिमेची आखणी सुरू झाली. त्यावेळी चाचणीसाठी एनोर्थसाईट खडकांची माती अमेरिकेतून आयात करावी लागत होती आणि तीही भरभक्कम किंमत देऊन. मग चंद्रयान मोहिमेचे प्रोजेक्ट डिरेक्टक मलयस्वामी अन्नादुराई यांनी म्हटलं की, आपण भूवैज्ञानिकांचा सल्ला घेऊ आणि अशा प्रकारची चंद्रावरची माती भारतातच शोधून काढू. त्यानंतर इस्रोने अंबळगन यांच्याशी संपर्क केला. ते आयआयटी मुंबईच्या जिओ-इन्फोर्मेशन अस्ट्रोनॉमी सेंटरमध्ये अभ्यासक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने संशोधन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की चित्तमबोंडीमधली माती चंद्रावरच्या मातीशी 99 टक्के जुळते. हा अभ्यास 2004 साली झाला. त्यानंतर 2012-13 मध्ये चित्तमबोंडीमधले एनोर्थसाईट दगड घेऊन ते भरडून त्यांनी माती तयार केली गेली.
Chandrayaan-3
अशी 50 टन माती इस्रोकडे पाठवली गेली. चंद्रयान – 2 याच मातीवर ठेवलं गेलं, त्याच्या चाचण्या करण्यात आल्या आणि नंतर चंद्रकडे रवाना करण्यात आलं. आता चंद्रयान – 3 च्याही अनेक चाचण्या याच प्रकारच्या मातीवर करण्यात आल्या आहेत. अंबळन, ज्यांनी चंद्रावरची माती पृथ्वीवर शोधून काढली ते आता सेलमच्या पेरियार विद्यापीठात सेंटर फॉर जिओ-इन्फोर्मेशनचे संचालक आहेत. बीबीसी तामिळने त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “चंद्राच्या पृष्ठभागावर दोन प्रकारचे खडक आहेत. एनोर्थसाईट आणि बेसाल्ट. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ एनोर्थसाईट खडक आहेत. नामक्कल जिल्ह्यातल्या चित्तमबोंडी इथे 1950-55 या काळात हे खडक सापडले. त्यावेळी या संशोधनाचं नेतृत्व करत होते सुब्रमण्यम् यांच्यासारखे संशोधक. चंद्र तयार झाला तेव्हाच पृथ्वीवर हे खडक तयार झाले असावे असं समजलं जातं.”
Chandrayaan-3
“1970 च्या काळात जेव्हा नासाने अपोलो चंद्रमोहिमा आखल्या तेव्हा चंद्रावर एनोर्थसाईट आणि बेसाल्ट खडक आहेत हा शोध लागला. त्यावेळी शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की चंद्रावरचे खडक पृथ्वीवरच्या काही खडकांशी साधर्म्य बाळगणारे आहेत.”
भारताच्या चंद्रमोहिमांविषयी सांगताना ते म्हणतात, “पहिली चंद्रयान मोहीम साधरणतः 2004 च्या सुमारास सुरू झाली. त्यावेळी आयआयटी बॉम्बे आणि सेलमच्या पेरियार विद्यापीठाने एकत्रित येत एनोर्थसाईट दगडांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. हे खडक चित्तमबोंडी भागात आहेच हे आम्हाला माहीत होतं.”
Chandrayaan-3
“अभ्यासादरम्यान आमच्या लक्षात आलं की चंद्रावरचे एनोर्थसाईट खडक आणि चित्तमबोंडीतले एनोर्थसाईट खडक यांच्यात 99 टक्के साम्य आहे. हे खडक चंद्राच्या दक्षिण भागात आहेत.” “चंद्रयान – 2019 च्या चाचणीच्या वेळेस इस्रोने चंद्रासारखा पृष्ठभाग बनवला आणि त्यावर लँडर आणि रोव्हरचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी आमच्याकडे चंद्रावर असेल तशी माती देण्याची मागणी केली आणि आम्ही ती पुरवली. इस्रोने त्या मातीचं परिक्षण करून ती वापरली,” Chandrayaan-3