Uddhav Thackeray | शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

Image Source 

Uddhav Thackeray : “शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी” असेही टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारला लगावला आहे.

हिंगोली येथील आपल्या निर्धार सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी’ अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हिंगोली येथील सभेत बोलत असून, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सत्तधारी पक्षावर निशाणा साधला. सरकार आपल्या दारी म्हणत असून, योजना फक्त कागदावरी असे असल्याचे यावेळी Uddhav Thackeray म्हणाले.

पुढे ते म्हणाले, काही जणांना अपेक्षा असेल मी गद्दरांवर बोलेन, पण मी गद्दरांवर वेळ घालवणार नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो असून, त्यावरच बोलणार आहे. मागे नागपंचमी झाली. आपण या गद्दाराला दूध पाजले पण त्याने पलटून चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा सापांना पायखाली ठेचलं पाहिजे, असे म्हणत Uddhav Thackeray यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

हेही वाचा

Sanjay Raut | ‘सनी देओलचा बंगला वाचवला, मग नितीन देसाईंना वेगळा न्याय का?’

Sharad Pawar | अजित पवार आमचे नेते, असं मी म्हटलंच नाही : शरद पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *