World Cup 2023 | यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे, त्यासाठी इंग्लंडच्या संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय असून भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी तो परतला आहे.
World Cup 2023 विश्वचषकासाठी बेन स्टोक्स याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड दौऱ्यापासून स्टोक्स इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा भाग असेल. इग्लंड व्यवस्थापकांच्या विनंतीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स याने एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतली आहे.
विश्वचषकाआधी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरोधात वनडे मालिका खेळणार आहे. बेन स्टोक्स न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या मालिकेपासून वनडे मध्ये पुनरागमन करणार आहे.
World Cup 2023
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबर रोजी सुरू होईल. या वनडे मालिकेसाठी बेन स्टोक्स (Ben Stokes) याची इंग्लंड संघात निवड केली गेली आहे. वर्कलोडमुळे स्टोक्सने मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु आता आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.
World Cup 2023 साठी इंग्लंडने आज संभाव्य संघाची घोषणा केली. यामध्ये बेन स्टोक्स याचेही नाव आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरले होते. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात बेन स्टोक्सचा मोलाचा वाटा होता. स्टोक्सने 66.43 च्या सरासरीने 465 धावा केल्या होत्या. याशिवाय गोलंदाजीतही सात विकेट्स घेतल्या होत्या.
World Cup 2023
अष्टपैलू बेन स्टोक्स याने इंग्लंडसाठी 105 वनडे सामने खेळले आहेत. यामधील 90 डावात स्टोक्स याने 2 हजार 924 धावा केल्या आहेत. 102 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 3 शतके आणि 21 अर्धशतके स्टोक्सने झळकावली आहेत. वनडेमध्ये गोलंदाजीत स्टोक्स याने 88 डावात 74 विकेट घेतल्या आहेत. 61 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
World Cup 2023