Niraj Chopra | नीरज चोप्राने World Athletics Championship मध्ये जिंकलं गोल्ड मेडल


Image Source

Niraj Chopra | भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदकविजेता नीरजने यंदाच्या World Athletics Championship 2023 स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे.

विशेष म्हणजे, यां स्पर्धेत पहिल्या फेरीत नीरज चोप्रा 12व्या स्थानी होता. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या डावात कोणतीही चूक न करता नीरजने आपली कामगिरी उंचावली. यानिमित्ताने World Athletics स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान नीरजच्या नावे नोंदवला गेला.

“ही स्पर्धा ऑलिम्पिकपेक्षा कठीण असते. शेवटच्या भालाफेकपर्यंत मी स्वतःला पुश केलं,” अशी प्रतिक्रिया नीरजने ही स्पर्धा जिंकल्यानंतर दिली आहे.

यंदाची World Athletics Championship 2023 ही स्पर्धा हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरू आहे. या स्पर्धेतील भालाफेक खेळाची स्पर्धा रविवारी (27 ऑगस्ट) रोजी खेळवण्यात आली. यामध्ये नीरजची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली.

पहिल्या फेरीत नीरजने केलेली भालाफेक फाऊल (अमान्य) ठरल्याने तो खूपच मागे राहिला होता. परंतु त्यानंतरही खचून न जाता दुसऱ्या फेरीत नीरजने 88.17 मीटर अंतर पार केलं. तर तिसऱ्या फेरीत नीरजला 86.32 मीटर अंतर गाठता आलं. नीरजने दुसऱ्या फेरीत गाठलेलं 88.17 मीटरचं अंतर कुणीच पार करू न शकल्याने अखेरीस सुवर्णपदक त्याच्या नावे झालं.

पाकिस्तानचा खेळाडू अरशद नदीम या स्पर्धेत 87.82 मीटर अंतरासह दुसऱ्या स्थानी तर चेक रिपब्लिकचा जेकब वादलेच हा 84.18 मीटरसह तिसऱ्या स्थानी राहिला.

Niraj Chopra ने टोक्योमध्ये झालेल्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. तिथेही Athletics मध्ये सुवर्णपदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू तो ठरला होता. तसंच गेल्या वर्षी डायमंड लीग स्पर्धेतही नीरजने गोल्ड मेडल जिंकलं होतं.

Niraj Chopra ने केलेल्या या कामगिरीचं भारतासह जगभरातून कौतुक होत आहे.

13 व्या वर्षी भालाफेकीला सुरुवात

Niraj Chopra चा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरयाणा जवळच्या पानिपत गावाजवच्या खंदरा खेड्यातला आहे. वडील शेतकरी आणि आई घरकाम करते. घरात खेळांचं वातावरण अजिबात नव्हतं.

परंतु 2010 मध्ये 13 वर्षांचा असताना Niraj Chopra ने पानिपतच्या एका मैदानात जसबीर सिंग नावाच्या एका खेळाडूला जोरात धावत येत हातातली अणकुचीदार वस्तू दूरवर फेकताना पाहिलं. हा सगळा प्रकार नीरजला नवीन होता. कुतुहल म्हणून तो तिथे रेंगाळला आणि घरी आला तो जयवीरचा मित्र होऊन, तसंच भालाफेकीची जुजबी माहिती घेऊनच.

‘खेळातला वेग, धावतानाचा तो आवेश आणि जसबीरची पिळदार शरीरयष्टी यांची त्यादिवशी मला भुरळ पडली. कुठलाही खेळ बघायला मला आवडायचं पण, यावेळी तो स्वत: खेळावासा वाटला,’ नीरजने आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या.

तेव्हा Niraj Chopra चं वजन होतं 80 किलो!

गावाजवळच भालाफेकीचं प्रशिक्षण मिळतं हे तर कळलं. पण, नीरज शेतकऱ्याचा खाता-पिता मुलगा होता. घरातलं दूध आणि पनीर यावर वाढला होता. Niraj Chopra घराण्यातल्या या लाडक्या मुलाचं वजन होतं चक्क 80 किलो. किंबहुना त्याचं वजन थोडं कमी व्हावं म्हणूनच त्याच्या वडिलांनी पानिपत मैदानावर खेळाच्या मैदानावर आणलं होतं.

ऑलिम्पिकपूर्वी Niraj Chopra चा उजवा हात मोडला होता

खरंतर दुखापती हा कुठल्याही खेळाच अविभाज्य भाग. पण, काही दुखापती कारकीर्दीवर परिणाम करणाऱ्या ठरतात. नीरजसाठी अशीच एक दुखापत त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच 2012 मध्ये झाली. पानिपतमध्येच बास्केटबॉल खेळताना त्याच्या उजव्या हाताचं मनगटाचं हाड मोडलं.

Niraj Chopra ची ही दुखापत इतकी गंभीर होती की, नीरजला त्या वयात भीतीच वाटली आपण पुढे खेळू की नाही. पण, नशीबाने तो या दुखापतीतून बरा झाला. उजव्या हाताला जखम झाली असली तरी त्यामुळे त्याच्या खेळाच्या शैलीवर परिणाम झाला नाही. पुढे ऑलिम्पिकसाठी तयारी करत असतानाही याच हाताला परत एकदा मार बसला आणि तो 2019 मध्ये तब्बल आठ महिने खेळापासून दूर होता.

Niraj Chopra

एकतर कोव्हिडमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नव्हत्या. आणि त्यातच दुखापतीतून सावरण्याचं आव्हान. पण, आधी ऑलिम्पिक पुढे गेलं आणि मग भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने घेतलेल्या चाचणी स्पर्धेपूर्वी नीरजने फिट होत नीरजने 83 मीटरवर भालाफेक करून कसंबसं शेवटच्या क्षणी ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. पण, त्याची चिकाटी आणि आत्मविश्वास इतका दांडगा की, त्याने मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करत गोल्ड जिंकलंच.

नीरज 19 वर्षांचा असताना 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून प्रकाशझोतात आला. त्यावेळी त्याने 86.48 मीटरचा जागतिक विक्रमही रचला. त्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नीरजचं कौतुक केलं होतं. आणि फेसबुकवर पोस्टही लिहिली होती. Niraj Chopra

हेही वाचा

World Cup 2023 | भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी बेन स्टोक्स परतला

Share Market News | जगात मंदी परंतु भारतात संधी : प्रा. डॉ. विजय ककडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *