PAK vs NEP Asia Cup | Asia Cup 2023 Pakistan vs Nepal : आजपासून आशिया कपच्या 16व्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळचा सामना यजमान पाकिस्तानशी होणार आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नेपाळचा संघ प्रथमच पाकिस्तानशी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. दोन्ही संघांना आशिया कप स्पर्धेत अ गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. PAK vs NEP Asia Cup
PAK vs NEP Asia Cup प्लेइंग इलेव्हन –
- पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
- नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम नाणेफेक झाल्यानंतर म्हणाला, आम्ही आधी फलंदाजी करू. खेळपट्टी खूपच कोरडी दिसत आहे. आम्ही प्रथम प्लेइंग इलेव्हन घोषित केले. यामागे कोणतेही मोठे कारण नव्हते, ते फक्त खेळाडूंना आत्मविश्वास देण्यासाठी होते. PAK vs NEP Asia Cup
नेपाळचा संघ प्रथमच आशिया कप खेळत आहे. याचा संदर्भ देत कर्णधार रोहित पौडेल म्हणाला की, सर्वजण आनंदी आहेत. आशिया कपमधील हा आमचा पहिला सामना आहे. नेपाळमधील प्रत्येक व्यक्ती या सामन्यासाठी उत्सुक आहे. इथे अनेक गोष्टी नेपाळसारख्या आहेत. फलंदाजीच्या दृष्टीने खेळपट्टी चांगली दिसत आहे. PAK vs NEP Asia Cup
???? T O S S A L E R T ????
Pakistan win the toss and elect to bat first ????#PAKvNEP | #AsiaCup2023 pic.twitter.com/iuuZfKfQv1
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 30, 2023
ICYMI: Our playing XI for the opening match of #AsiaCup2023 ????#PAKvNEP pic.twitter.com/dUzdzZMOyH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 30, 2023
विशेष म्हणजे नेपाळचा हा आशिया कपमधील पदार्पण सामना आहे. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. परंतु पाकिस्तानविरुद्ध विजयाची नोंद करणे सोपे नसेल. नेपाळकडे चांगली गोलंदाजी असली तरी. संदीप लामिछाने हा अनुभवी गोलंदाज आहे. तो संघासाठी एक्स फॅक्टर बनू शकतो. PAK vs NEP Asia Cup