Prakash Ambedkar | मुंबईत ‘India’ या देशभरातील विरोधी पक्षांच्या आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख Prakash Ambedkar यांना या बैठकीला बोलावलंच गेलं नसल्याचं म्हटलं आहे.
यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचं दिसत असलं, तरी काही पक्षांना या बैठकीचं निमंत्रणच दिलेलं नसल्याचं समोर येत आहे. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीला बैठीकचं निमंत्रण नसल्याचं सांगत आता काँग्रेसलाच याबाबत विचारा असं म्हटलं. बुधवारी (३० ऑगस्ट) भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी आयोगाच्या सुनावणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
Prakash Ambedkar म्हणाले, “आम्ही शिवसेनेबरोबर अजूनही आहोत. आता आम्हाला ‘India’ आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण का दिलं नाही याबाबत माध्यमांनी काँग्रेसला प्रश्न विचारणं अधिक योग्य होईल. २०१९ मध्येही आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. याहीवेळी आम्ही त्यांना ऑफर दिली आहे. परंतु काँग्रेसच आम्हाला आघाडीबाबत निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीत नाही.”