Modi Government | मोदी सरकार आणणार ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक?

Image Source

Modi Government | नोटबंदी, कलम 370, समान नागरी कायदा यासह मोदी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यातच आता मोदी सरकार देशात ‘एक देश-एक निवडणूक’बाबत निर्णय घेणार आहे. ‘एक देश-एक निवडणूक’ हे विधेयक मंजूर झाल्यास देशात एकच निवडणूक पद्धती अवलंबली जाणार आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

Modi Government लवकरच एक देश एक निवडणूक विधेयक आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आलीय आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन असणार आहे. या विशेष अधिवेशनात हे महत्त्वाचं विधेयक आणण्याची तयारी सरकारनं केल्याचं समजतंय. यासह समान नागरी कायदा, महिला आरक्षण विधेयकही आणण्याची तयारी मोदी सरकारनं केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विरोधकांना धक्का देण्यासाठी ही रणनीती आखल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *