One Nation One Election | देशात सध्या ‘एक देश, एक निवडणूक’ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेता येतील का? याबाबत ही समिती अभ्यास करुन रिपोर्ट सादर करणार आहे.
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे ‘एक देश, एक निवडणूक’बाबत मोदी सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं स्पष्ट आहे.
‘एक देश, एक निवडणूक’ नेमकं काय?
‘एक देश, एक निवडणूक’ याचा सरळ अर्थ देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळस घेणे असा आहे. नागरिकांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल. सध्या देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात.
‘एक देश, एक निवडणूक’ साठी आतापर्यंत तीन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली चौथी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती १५ दिवसांत आपला रिपोर्ट सादर करेल काय, याबाबत प्रश्न आहे.