Maratha Andolan | मराठा समाज आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने

Image Source 

Maratha Andolan | जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तर आतापर्यंत १४ ते १५ एसटी बस जाळण्यात आल्या आहेत. यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालं असून मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आदेश राज्य परिवहन मंडळाने राज्यातील सर्व आगारांना दिले आहेत. Maratha Andolan

सध्या नाशिकहून छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. हिंगोली आगाराची एसटी बस वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, एसटी बस बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

बीडमध्ये मराठा बांधव आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सराटे आंतरवाली गावातील घटनेच्या निषेधार्थ आज ही बंदची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान हा सर्व प्रकार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गृह विभागाने घडवून आणला आहे. कारण आज पर्यंत मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेत पार पडले आहेत. कुठेही गालबोट लागलं नाही. मात्र काल गालबोट लावण्यात आले आहे. आमच्या मराठा भगिनींवर गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय. असा गंभीर आरोप यावेळी आंदोलकांनी दिलाय. तसेच आता तरी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू. असा इशारा बीडमधून मराठा बांधवांनी दिलाय. Maratha Andolan

जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. थोड्याच वेळात राज्यभरातल्या मराठा समन्वयकांची बैठक होणार असून या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

अंबड तालुक्यातल्या सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून घटनेच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे.

राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये आज बंद पाळण्यात येणार आहे. या घटनेचे आजही पडसाद उमटत आहे. धुळ्यात जाळपोळीमुळे वाहतूक कोंडी झाली. तर औरंगाबादमध्येही सकाळीच आंदोलकांनी जाळपोळ करून निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे जालन्यात जाणार असून मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत. Maratha Andolan

हेही वाचा

INDIA Meeting | ‘मोदींना चंद्रावर नाही, सूर्यावर पाठवा

Gas Price Today | गॅस २०० रुपयांनी स्वस्त, या असतील नव्या किंमती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *