Ind vs Pak Asia Cup | हवामानाचा अंदाज काय?

Image Source 

Ind vs Pak Asia Cup 2023 : आशिया कप 2023 चा बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान महामुकाबला आज खेळवला जाणार आहे.

अ गटातील हा दुसरा सामना असणार आहे. तर टीम इंडियाचा हा या आशिया कपमधील पहिला सामना आहे. भारत आणि पाकिस्तान कँडीच्या पल्लेकल्ले क्रिकेट स्टेडिमयवर आमने-सामने असतील.

Ind vs Pak Asia Cup सामन्यात चाहत्यांना चुरशीच्या लढती पाहायला मिळू शकतात. यामध्ये शाहीन आफ्रिदी आणि रोहित शर्मा यांच्याच चुरस रंगणार आहे तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसमोर बुमराहचे आव्हान असणार आहे. सोबतच हारीस रौफ आणि विराट कोहलीची टक्करही चाहत्यांना पाहायला मिळेल. Ind vs Pak Asia Cup

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मेगा मॅचचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनलवर होणार आहे. हा सामना तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या चॅनेलवर पाहू शकता. त्याच वेळी, तुम्ही डिस्ने + हॉटस्टार अॅपवर हा सामना ऑनलाइन पाहू शकता. तुम्ही Disney+Hotstar अॅपवर सामना विनामूल्य पाहू शकाल. Ind vs Pak Asia Cup

भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान आकाश ढगाळ राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. AccuWeather च्या अहवालानुसार १० मिमी पाऊस पडण्याची ६० ते ८० टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता नाही, पण षटके नक्कीच कापली जाऊ शकतात.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. Ind vs Pak Asia Cup

बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हरिस. रौफ , नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी. Ind vs Pak Asia Cup

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान १७व्यांदा आमनेसामने असतील. गेल्या १५ हंगामात T20 आणि एकदिवसीय फॉर्मेट मिळून दोन्ही संघ एकूण १६ वेळा भिडले आहेत. १६ पैकी सर्व १५ सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली आहे. तर एका सामन्याचा (वर्ष १९९७) निकाल लागला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *