Eknath Shinde पुण्यात बॅनरबाजी
राज्यात अनेक नेत्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जातो. त्यासंदर्भातील बॅनर लावले जातात. पुणे शहरात लावलेल्या बॅनरची चांगलीच चर्चा होत असते. आता एकनाथ शिंदे यांचे बॅनर पुणे शहरात लागले आहे…
सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न द्या
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी पुणे शहरात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटा राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारसोबत सत्तेत आहे.
Eknath Shinde पुण्यात बॅनरबाजी
पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल
पुणे मेट्रोचा वेळापत्रकात रविवार एक दिवसासाठी आज १० सप्टेंबर रोजी बदल करण्यात आला. पुणे मेट्रो रविवारी एक तास उशिराने धावली. तांत्रिक कारणास्तव पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. यामुळे दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो प्रवासी सेवा सकाळी 7 वाजल्यापासून सुरु होणार आहे. वनाज मेट्रो स्टेशन ते गरवारे आणि सिव्हील कोर्ट ते रूबी हॉल स्टेशन या दोन्ही मेट्रो 1 तास उशीराने धावणार आहे.
Eknath Shinde पुण्यात बॅनरबाजी