Diabetes and fruit रूग्णांनो ‘या’ फळांपासून सावधान . तुम्हाला माहिती आहे का काही फळे अशी आहेत जी डायबिटीसच्या पेशंटसाठी हानिकारक आहेत. आता ही फळे कोणती याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
सध्या बहुतेक लोकांना डायबिटीसचा त्रास असतो. दररोजचे धकाधकीचे जीवन, बदलते वातावरण, टेन्शन अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांना डायबिटीसचा त्रास निर्माण होताना दिसतो. डायबिटीस झाल्यानंतर त्या लोकांना खूप प्रकारची पथ्य पाळणे गरजेचे असतं. नियमित गोळ्या घेण्यासोबतच आहारात पथ्य पाळणे देखील त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे डायबिटीसचे पेशंट जास्त प्रमाणात फळे खाताना दिसतात, त्यांच्या आहारात फळांचा समावेश करताना दिसतात.
Diabetes and fruit रूग्णांनो ‘या’ फळांपासून सावधान
चिकू – चिकू हे फळ खायला खूप गोड लागते आणि बऱ्याच लोकांना हे फळ मोठ्या प्रमाणात आवडते. पण डायबिटीसच्या पेशंटसाठी चिकू हे फळ फायदेशीर नाहीये. डायबिटीसच्या पेशंटनी हे फळ खाऊ नये, कारण ते खूप गोड असल्यामुळे त्यांची शुगर वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे चिकू हे फळ खाणं त्यांनी जास्तीत जास्त टाळावं.
Diabetes and fruit
लीची – बहुतेक लोकांना लीची हे फळ खायला भरपूर आवडते. पण डायबिटीसच्या पेशंट हे फळ आवडत जरी असलं तरी खाऊ नये. कारण हे फळ खायला गोड लागतेच सोबत या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे डायबिटीस पेशंटची शुगर लेवल मोठ्या प्रमाणात वाढते आणि ते डायबिटीस पेशंटसाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्या पेशंटने लीची फळ खाणं.
खारिक – खारीक हा एक खजूरचा प्रकार आहे. ओले खजूर वाळवल्यानंतर त्याचे खारीक तयार होते. खजूर हे ओले असताना ते आधीच भरपूर गोड असते त्यात ते सुकल्यानंतर त्यातील गोडवा आणखीन वाढतो जे डायबिटीस पेशंटसाठी हानिकारक असते. खारीक डायबिटीसच्या पेशंट खाऊ नये नाहीतर त्यांची शुगर मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
Diabetes and fruit रूग्णांनो ‘या’ फळांपासून सावधान अननस – अननस हे फळ देखील खायला चांगले लागते आणि गोड देखील असते. पण डायबिटीसच्या पेशंटसाठी हे फळ हानिकारक ठरू शकते. हे फळ खाल्ल्यानंतर डायबिटीस पेशंटची शुगर लेवल वाढते, त्यामुळे अशा पेशंटने हे फळ खाऊ नये.
Diabetes and fruit रूग्णांनो ‘या’ फळांपासून सावधान केळी – केळी हे फळ पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण केळीमध्ये फायबरचे गुण असतात जे पचनास मदत करतात. तसेच लीची प्रमाणे केळीमध्ये सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स असते जे डायबिटीस पेशंटची शुगर लेवल वाढवते, त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटने केळी खाणं टाळावं.