Nepal team’s world record broke | नेपाळने रचला आशियाई T20 स्पर्धेत इतिहास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमकुवत असलेल्या नेपाळ संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष टी 20 सामन्यात मंगोलिया विरुद्ध बुधवारी चक्क तीन नव्या विश्वविक्रमाची नोंद केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमकुवत असलेल्या नेपाळ संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष टी 20 सामन्यात मंगोलिया विरुद्ध बुधवारी चक्क तीन नव्या विश्वविक्रमाची नोंद केली.नेपाळचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज दीपेंद्रसिंग एरि याने केवळ नऊ चेंडूत अर्दर्शक ठोकून भारतीय फलंदाज युवराजसिंग याचा सोळा वर्ष
जुना विक्रम मोडीत काढला युवराज ने 19 सप्टेंबर 2007 ला इंग्लंड विरुद्ध विश्वचषकाच्या t20 सामन्यात 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
दिपेंद्र सिंगच्या धडाकेबाज कामगिरी बरोबरच कुशल मल्लाने मल्लाने फक्त५० चेंडूत 8 चौकार व 12 षटकारांसह नाबाद 132 धावा केल्या. कर्मधार रोहित पौडेल यानेही 27 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारासह 61 धावा ठोकल्या. या जोरावर नेपाळने वीस षटकात तीन बाद 314 धावांचा डोंगर उभा केला. मंगोलिया संघाला नेपाळ संघाने यावेळी केवळ 41 धावात गुंडाळले यासह नेपाळने तब्बल 273 धावाने दणदणीत विजय मिळवला.
Nepal team’s world record broke
*स्फोटक कामगिरी*
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 300 वर धावा काढणारा नेपाळ पहिला संघ ठरला.याआदी अफगाणिस्ताने 23 फेब्रुवारी 2019 ला आयर्लंडविरुद्ध 3 बाद 278 धावा केल्या होत्या.
कुशाल मल्ला यांनी केवळ 34 चेंडूत, T20 त सर्वात वेगवान शतक ठोकले, त्याने डेव्हिड मिलर आणि रोहित शर्मा यांचा संयुक्त विश्वविक्रम मोडला, दोघांनी 35 चेंडू शतक ठोकले होते