Police Patil Post Direct Service Recruitment-2023 | पोलीस पाटील पद सरळसेवा भरती मुदतवाढ

Police Patil Post Direct Service Recruitment-2023

पोलीस पाटील पद सरळसेवा भरती-2023

माढा उपविभागातील पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्याची मुदत 5 ऑक्टोबर पर्यंत वाढवली

सोलापूर, दि. 29 ( जिमाका):- उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग कुर्डूवाडी यांचेकडुन दि. 14 सप्टेंबर2023 अन्वये पोलीस पाटील पद सरळ सेवा भरती 2023 चा जाहीरनामा प्रसिध्द करणेत आलेला होता. त्यामध्ये ज्या व्यक्तीस पोलीस पाटील म्हणून काम करणेची इच्छा आहे. त्यांनी आपले अर्ज दिनांक 18 सप्टेंबर 2023 पासुन दि. 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत ( शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय माढा विभाग कुईवाडी येथे समक्ष सादर करणेबाबत कळविणेत आले होते.

तथापि जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील आदेश दि. 27 सप्टेंबर 2023 अन्वये अनंत चुतर्दशीची दि. 28 सप्टेंबर 2023 रोजीची स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. तसेच दि.29 सप्टेंबर 2023 ते 2ऑक्टोबर 2023 पर्यंत सलग शासकीय सुट्टी आल्याने, अर्जदारास पुराव्याची कागदपत्रे विहीत मुदतीत जमा करणेस शक्य होणार नाही, ही बाब निदर्शनास आली आहे.

तरी उमेदवारास अर्ज करणेची मुदत वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे सुधारित जाहिरनामा प्रसिध्द करून, त्याद्वारे माढा उपविभागातील माढा व करमाळा तालुक्यातील पोलीस पाटील भरतीमधील गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज दिनांक दि.03 ऑक्टोबर 2023 ऐवजी दि.05 ऑक्टोबर 2023 पर्यंत ( शासकिय सट्टीचे दिवस वगळून) सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांचे कार्यालयात समक्ष सादर करावेत. या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस पाटील निवड समिती 2023 चे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी माढा प्रियंका आंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकांना वेळ कळविले आहे. तसेच दि.14 सप्टेंबर 2023 रोजीच्या जाहिरनाम्यातील इतर कोणताही बदल नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *