Sterilization of stray dogs | कुत्र्याचे निर्बिजीकरण महानगरपालिकेचा उपक्रम
Sterilization of stray dogs सोलापूर शहरातील मोकाट व भटके कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु
सोलापूर दिनांक 14 ऑक्टोंबर [ Sachinkumar Jadhav ]
सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मोकाट व भटक्या कुत्र्याचं निर्बिजीकरण व लसीकरण उपक्रम राबविण्याकरीता नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार या शासन पुरस्कृत संस्थेला भटक्या कुत्र्यांचे निर्भीजीकरण करण्याच्या मक्ता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या समोर असलेल्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या जागेत भटक्या कुत्र्यांच्या निर्जीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
निर्मिकीकरण म्हणजेच नसबंदीचे काम सन 2026 पर्यत सातत्याने करण्यात येणार आहे. महापालिकेस कुत्रे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने मार्च 2024 पर्यंत सुमारे 3200 कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक भागात कुत्रे घोळक्याने फिरत असतात. त्यामुळे अनेक वाहन धारकांना व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकेने निविदा प्रक्रियाअंती नंदुरबार येथील संस्थेला निर्बिजीकरणाचा मक्ता दिला आहे. कुत्र्यांना पकडून त्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने निर्बिजीकरण व लसीकरण करुन त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात येणार आहे.
Sterilization of strahy dogs सोलापूर शहरातील मोकाट व भटके कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु
शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास कार्यालयीन अधिक्षक म.गांधी प्राणीसंग्रहालय तसेच मक्तेदार यांच्या कडून हेल्पलाईन क्रमांक 7666513026 जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.