SOLAPUR RTO | दोन चाकी वाहना नोंदणी क्रमांकाची नवी मालिका
सोलापूर, दि. 01 – सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दोनचाकी वाहनासाठी MH १३ EH ही नवीन मालिका सुरु होणार आहे. तरी आकर्षक पसंतीचे क्रमांक हवा असेल तर राष्ट्रीयकृत बँकेचे डीडी DYRTO सोलापूर परिवहन कार्यालयात दुपारी 3.00 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी आवाहन केले आहे.
एकच आकर्षक क्रमांकाकरिता जास्तीत जास्त अर्ज आले तर लिलाव करुन क्रमांक देण्यात येईल. अर्जासोबत आधारकार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे डीडी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक एम. बी. सुरवसे, यांचेकडे सादर करावा.असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी पत्राव्दारे कळविले आहे.