Half-naked movement
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी चंद्रभागेत अर्धनग्न आंदोलन
पंढरपुरात आदिवासी जमातीचा आक्रोश!
पंढरपुर दिनांक 8 नोव्हेंबर
रोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये दि. 2 जानेवारी 1848 रोजी ज्या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना इंग्रजांनी अटक केली होती. त्याच जागी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारावे या मागणीसाठी महादेव कोळी समाजाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महादेव कोळी समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, ‘‘तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राघोजी भांगरे यांच्या स्मारकास मंजुरी दिलेली आहे. परंतु निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम अद्याप चालू झालेले नाही. तातडीने निधी मंजुर करून स्मारकाचे काम ताबडतोब मार्गी लावावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.‘‘
तसेच जळगाव या ठिकाणी महादेव कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावे या मागणीसाठी 25 दिवस आमरण उपोषण चालू होते परंतु राज ठाकरे ,उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडवणीस, अजित पवार ,शरद पवार ,विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज यांनी आंदोलनात स्थळी भेट दिली नाही व त्याबाबत कुठेही वाच्यता सुद्धा केली नाही. याबद्दल त्यांचा फोटो प्रतिमा हातात घेऊन जाहीर निषेध करण्यात आला आहे.
तसेच जात प्रमाणपत्र देत असताना पंढरपुरचे प्रांताधिकारी गजानन गुरव महादेव कोळी जमातीला दुजाभाव करत आहेत. साधे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्यास भाग पाडत आहेत. पडताळणी समिती ही ते प्रस्ताव रिजेक्ट करून हायकोर्टामध्ये चॅलेंज करायला लावत आहे. सर्वसामान्य आदिवासी आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असल्याने या गोष्टी करू शकत नाही. प्रांताधिकारी गजानन गुरव यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नेमले आहे की जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव रिजेक्ट करण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित होत असून हे अधिकारी फक्त शासनाचा पगार लाटण्यासाठी त्या पदावर बसलेत की सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी? असा खडा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
श्री.अंकुशराव पुढे म्हणाले की, की कार्तिकी वारी आता जवळ आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न होते. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचा व जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या देण्यात यावे असा शासन आदेश सरकार करत नाही तो पर्यंत कार्तिकी वारीमध्ये उपमुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी राज्य सरकार व प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील असे ते म्हणाले आहेत. यावेळी गणेश अंकुशराव, बाळासाहेब बळवंतराव, रघुनाथ अधटराव, पी.के. परचंडे, मेजर शिरसट, जालिंदर करकमकर, पांडुरंग सावतराव, विश्राम कोताळकर, बाबासाहेब अभंगराव, कुणाल अधटराव, विजय अभंगराव, सुरज कांबळे, रामभाऊ कोळी, गणेश अभंगराव, वैभव अभंगराव, सचिन नेहतराव, प्रविण कांबळे, लखन माने, अमोल माने, विशाल कोताळकर, ओंकार परचंडे, अमोल तारापुरकर, सचिन माने, सागर तारापुरकर, देवा कांबळे, अमोल नेहतराव, दिपक सावतराव, सचिन अभंगराव, महेश माने, नितेश म्हेत्रे, आबा टोमके, अप्पा करकमकर, किशोर सुरवसे, श्रीकांत अभंगराव, बालाजी कोळी, वैभव माने, सोमनाथ अभंगराव, लल्ल्या परचंडे, सतीश कस्तुरे, विजाबा परचंडे, बापु भालेराव, अनिल अधटराव, सुंदर तारापुरकर, माऊली कोळी, श्रीकांत बळवंतकर, नामदेव अंकुशराव, तुकाराम अंकुशराव यांचेसह महर्षी वाल्मिकी संघाचे व महादेव कोळी समाजाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.