Do not drink alcohol | drink milk संभाजी ब्रिगेड नववर्ष उपक्रम

संभाजी ब्रिगेड चा उपक्रम
संभाजी ब्रिगेड चा उपक्रम

Do not drink alcohol | drink milk संभाजी ब्रिगेड नववर्ष उपक्रम

युवकांनो दारू नाही दूध प्या या उपक्रमाने संभाजी ब्रिगेडने केले नववर्षाचे स्वागत.

सोलापूर (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम युवकांनो दारू नको दूध प्या या उपक्रमाने मसाला दुधाचे वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे पाश्चात्य देशाचे अनुकरण करून आजची तरुण पिढी व्यसनांकडे वळत आहे येणारी पिढी ही सक्षम सदृढ आणि निर्वसणी झाली पाहिजे हा या उपक्रमाचा उद्देश आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले.
एक व्यक्ती निर्वसणी तर घर सुरक्षित घर सुरक्षित तर देश सुरक्षित एका दारूच्या बाटली मुळे जिंदगी बरबाद होते. घरातील शांतता संपुष्टात येते त्यामुळे युवकांनी व्यसन करू नये असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बंदोबस्तवर उपस्थित पोलीस बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहर प्रमुख सिताराम बाबर सुलेमान पिरजादे ओंकार कदम रमेश चव्हाण दत्तात्रय जाधव विकी पाटील रवी शिरगिरे श्रीकांत माळवतकर अजमल शेख आयाझ दिना मेंबर सिद्धार्थ बनसोडे नागेश पवार मुस्तफा शेख सोनाली पवार राजेंद्र माने बसवराज आळंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *