Solapur Kabbadi सोलापूरात कबड्डीला लोकाश्रय
Solapur Kabbadi सोलापूरात कबड्डीला लोकाश्रय.
सोलापूर दिनांक
सोलापूरच्या कबड्डी ने इतिहास निर्माण केला होता. क्रीडा प्रकाराविषयी बोलायचं झालं तर सोलापूर म्हणजे कबड्डी आणि कबड्डी म्हणजेच सोलापूर असे समीकरण पूर्वी पाहायला मिळायचं. चढाओढीच्या राजकारणात सोलापुरातील क्रीडा प्रकार दुर्लक्षित झाल्याचं दिसून येतं याचा सर्वात जास्त फटका कबड्डी या खेळाला बसल्याचे दिसून येतं. सोलापूरात कबड्डीला लोकाश्रय आहे परंतु सक्षम दणकट राजाश्रय न मिळाल्याने या खेळाचे किंबहुना खेळाडूंचे अतोनात नुकसान झाले आहे. दणकट राजाश्रय नसल्यानेच सोलापूर शहरात महापौर चषक होऊ शकला नाही. याला सर्वस्वी सोलापुरातील राजकारणी मंडळे जबाबदार आहेत. असा आरोप आजी माझी खेळाडू करत आहेत. कबड्डी असो अथवा इतर कोणताही खेळ असो त्या खेळाला प्रशासकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं पाहिजे.
कबड्डीचा भारतीय इतिहास
भारतात अखिल भारतीय कबड्डी संघाची स्थापना सन 1950 साली झाली. कबड्डीच्या दोन प्रमुख शाखा आहेत: “पंजाबी कबड्डी”, ज्याला “वर्तुळ शैली” असेही संबोधले जाते, त्यामध्ये खेळाच्या पारंपारिक प्रकारांचा समावेश आहे जो बाहेर गोलाकार मैदानावर खेळला जातो, तर “मानक शैली”, यात हा खेळ आयताकृती कोर्टवर खेळला जातो. प्रमुख व्यावसायिक लीग आणि आशियाई खेळांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हीच शैली वापरली जाते. कबड्डी हा सांघिक खेळ आहे, कबड्डीचा उगम तामिळनाडूमध्ये झाला. तमिळनाडू सह आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तेलंगणा व उत्तर प्रदेश या राज्यांचा खेळ आहे.
मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया इत्यादी देशात खेळला जातो..
सोलापुरात कबड्डीला लोकाश्रय मिळवून देणाऱ्या संघटन