LIquor Selling Stop | यात्रेनिमित्त पंढरपुरात आदेश

पंढरपुरात दारूबंदी
पंढरपुरात दारूबंदी

LIquor Selling Stop | यात्रेनिमित्त पंढरपुरात आदेश

माघी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील देशी, विदेशी मद्य व ताडी विक्री बंद

सोलापूर/पंढरपूर दि.16 [ Sachinkumar Jadhav]

श्री क्षेत्र पंढरपूर येथे  होणाऱ्या माघी यात्रेनिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने पंढरपुरातील सर्व देशी, विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.

पंढरपूर शहराला अध्यात्माचा वारसा लाभला आहे देश विदेशातून लाखोच्या संख्येने भाविक पंढरपुरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात. यात्रेच्या काळात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासन आणि प्रशासनाच्या वतीने अनेक विविध उपयोजना केल्या जातात त्याचप्रमाणे खबरदारीही घेतली जाते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आदेश जारी केले असून, मंगळवार दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी संपुर्ण दिवस पंढरपूर शहरातील देशी, विदेशी मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवावेत. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *