Modi Guarantee Van | 25 हजार नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा घेतला लाभ
Dainikloksanwad.com
संपादक Sachinkumar Jadhav
(Mo.7385352309)
सोलापूर, दि. 26 : केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आलेल्या Modi Guarantee Van ला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुस-या टप्प्याचा समारोप 25 फेब्रुवारी रोजी साईबाबा चौक, सोलापूर येथे करण्यात आला. या यात्रेदरम्यान शहरातील 36 ठिकाणी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये सुमारे 25 हजार नागरिकांनी सहभागी होऊन विविध केंद्रीय योजनांचा लाभ घेतला, अशी माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप व क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली.
केंद्र शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत पोहोचावी तसेच त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ शिबिरांच्या माध्यमातून व्हावा या उद्देशाने सुरु झालेल्या या यात्रेदरम्यान 9 हजार 378 नागरीकांनी संकल्प प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकाच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, उज्वला योजना व आधार कार्ड संदर्भात माहिती आणि प्रत्यक्ष लाभ देण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये प्रधानमंत्री उज्जवला योजनेचा 716 जणांना लाभ देण्यात आला. तसेच 1 हजार 350 नागरिकांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. 1 हजार 866 जणांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि 392 नागरीकांनी आधार दुरुस्ती व नवीन नाव नोंदणीचा लाभ घेतला. तसेच 2 हजार 175 नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘मेरी कहाणी मेरी जुबानी’ या उपक्रमांतर्गत केंद्रीय योजनांचा लाभ घेतल्या 41 लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ऑडिओ-विडीओच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली.
Modi Guarantee Van समारोप प्रसंगी क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, आरोग्य विभागाचे डॉ. बालराज म्हेत्रे, डॉ. अलकुंटे, डॉ.शैलजा जयदीप व नर्स स्टाफ, एनयूएलएमचे राघवेंद्र अलकुंटे, प्रधानमंत्री आवास योजना समाज विकास अधिकारी सिध्दाराम मेंडगुदले, नागनाथ पदमगोंदे, पूजा भूतनाळे, आरोग्य मित्र सुमित जाधव, शशिकांत सकट, महिला व बालकल्याणचे प्रथमेश सदाफुले, प्रमोद बचूवार, घनकचरा व्यवस्थापनचे दामिनी जवळकर, तेजस शहा, स्वच्छता निरीक्षक शेख, वाहन चालक महादेव चिवरे, ऑपेरेटर विजय माळी आदि उपस्थित होते.