Percentage of Total Votes in Solapur and Madha Lok Sabha Constituencies
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ,सोलापूर मतदारसंघासाठी 57.46 टक्के तर माढा मतदारसंघासाठी 59.87 टक्के मतदान झाले आहे.
सोलापूर, दिनांक 7 [Sachinkumar Jadhav]
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दि. 07 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यावेळी सायंकाळी 6 वाजपर्यंत 42-सोलापूर (अ.जा.) मतदार संघासाठी अंदाजित 57.46 टक्के व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजित 59.87 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
यावेळी 43-माढा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महसूल अमृत नाटेकर आदि उपस्थित होते.
यामध्ये 42-सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघाचे एकूण मतदार संख्या 20 लाख 30 हजार 119 इतके मतदार असून त्यापैकी 11 लाख 66 हजार 600 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. झालेल्या मतदानामध्ये पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी 60.8 टक्के तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी 54.74 टक्के इतकी आहे.
यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे –
247 मोहोळ 60.16, टक्के
248 सोलापूर शहर उत्तर 56.81 ,टक्के
249 सोलापूर शहर मध्य 56.32,टक्के
250 अक्कलकोट 55.31 ,टक्के
251 सोलापूर दक्षिण 58.21,टक्के
252 पंढरपूर 58.09टक्के
मतदान झाले, असे एकूण मतदानाची टक्केवारी 57.46 टक्के झाली आहे.
43 माढा लोकसभा मतदारसंघात….
माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 19 लाख 91 हजार 454 इतकी असून त्यापैकी 11 लाख 92 हजार 190 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे
244 करमाळा 55 टक्के
245 माढा 61.13 टक्के
253 सांगोला 59.94 टक्के
254 माळशिरस-60.28 टक्के
255 फलटण-64.23 टक्के
258 माण-58.42 टक्के
मतदान झाले, असे एकूण मतदानाची टक्केवारी 59.87 टक्के झाली आहे.