PM Narendra Modi New Cabinet

PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi New Cabinet

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी हॅट्रिक संभाव्य मंत्रिमंडळ जाहीर

 

नवी दिल्ली दिनांक 9 जून Sachinkumar Jadhav

लोकसभेच्या संसदीय दल नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रविवार दिनांक 9 जून रोजी सायंकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत इतर कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री स्वतंत्र कारभार राज्यमंत्री अशा जवळपास 50 ते 60 खासदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत असं विश्वासनीय सूत्राकडून सांगण्यात आला आहे.

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षास 241 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष असल्याने. त्या पक्षाच्या संसदीय दल नेत्यास भारताचे महामहिम राष्ट्रपती हे प्रधानमंत्री पदाची शपथ देत असतात. भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले 241 खासदार व मित्र पक्षाचे खासदार म्हणजेच NDAचे एकूण लोकसभेतील संख्याबळ 293 एवढे आहे.

नरेंद्र मोदी यांच्या 3.0 मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील जवळपास सहा खासदारांना केंद्रीय मंत्री पद देण्यात येणार आहे. यामध्ये नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे मुरलीधर मोहोळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे. NDA मधील महाराष्ट्रातील घटक पक्ष शिवसेनेचे प्रताप जाधव व RPI चे राज्यसभा खासदार रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश असणारे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला एक स्वतंत्र पदभार राज्यमंत्रीपद आला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करण्यात आहे. शिवाय प्रफुल पटेल व सुनील तटकरे या दोघांनीही मंत्री पद मिळावं यासाठी जोरदार बिल्डिंग लावलेली आहे आग्रह धरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी संधी देण्यात येणार आहे.

NDA आघाडीतील TDP, JDU, LJP, RLD ,JDS, जनसेना व अपना दल हे एनडीएचे घटक म्हणून सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. माहितीनुसार चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाला 4 व नितेश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षास 4 मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लोक जनशक्ती पार्टीला दोन मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य नावे

उत्तर प्रदेश…..

राजनाथ सिंह

जितिन प्रसाद

एसपी सिंग बघेल

पंकज चौधरी

गुजरात……

अमित शहा

मनसुख मांडविया

मध्य प्रदेश…..

ज्योतिरादित्य सिंधिया

शिवराज सिंह चौहान

हरियाणा…

राव इंद्रजीत

कृष्णपाल गुर्जर

मनोहर लाल खट्टर

राजस्थान…..

अर्जुन मेघवाल

भूपेंद्र यादव

महाराष्ट्र….

नितीन गडकरी

पियुष गोयल

रामदास आठवले

रक्षा खडसे

मुरलीधर मोहोळे

ओडिशा…..

वैजयंत पांडा,

अपराजिता सारंगी

 

या नावांचीही चर्चा

 

 

एस जयशंकर

 

जेपी नड्डा

 

डॉ जितेंद्र सिंग

 

अश्विनी वैष्णव

 

शंतनू ठाकूर,

 

सुरेश गोपी,

 

विप्लव देब,

 

सर्बानंद सोनेवाल,

 

हरदीप पुरी,

 

तापीर गाव,

 

संजय बंडी/जी किशन रेड्डी,

 

प्रल्हाद जोशी,

 

शोभा करंदळे,

 

पीसी मोहन,

 

राजीव चंद्रशेखर

 

मित्रपक्षांचे हे नेते मंत्री होऊ शकतात

 

RLD – जयंत चौधरी

JDU- लल्लन सिंग किंवा संजय झा, रामनाथ ठाकूर

शिवसेना – प्रतापराव जाधव

लोजप – चिराग पासवान

जेडीएस – कुमार स्वामी

टीडीपी – राम मोहन नायडू, के रवींद्रन

राष्ट्रवादी – ?

अपना दल – अनुप्रिया पटेल

आरपीआय – रामदास आठवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *