Attack on Journalist | Allegations against illegal health officer of Solapur
पत्रकारावर हल्ला; आरोप सोलापूर महानगरपालिकेच्या बेकायदेशीर आरोग्य अधिकार्यावर
बेकायदेशीर नियुक्ती – बातमीच्या माध्यमातून पंचनामा, सत्य उजेडात आणणाऱ्या पत्रकारावर हल्ला
सोलापूर दिनांक 29
सोलापूर महानगरपालिकेच्या पात्रता नसलेल्या बेकायदेशीर आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी गुंडा करवी पत्रकार संपादक सैपन शेख यांच्यावर खुनी हल्ला केला आहे. गुरुवार दिनांक 27 जून रोजी सिविल चौकातील कंकुबाई हॉस्पिटल समोर साधारण दुपारी तीन ते चार च्या दरम्यान श्रीकांत गायकवाड नामक गुंडाने सैफन शेख यांच्यावर खुनी हल्ला केला आहे.
यात हकीकत अशी की, सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी पदावर डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. आणि ही प्रतिनियुक्ती नगर विकास मंत्रालयातून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. हे नियुक्ती शासकीय नियमाला पायदळी तुडवत बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचं सैफन शेख यांनी उघडकीस आणलं आहे. आरोग्याधिकारी पदावर विराजमान असणाऱ्या डॉक्टरांकडे MBBS [DHP /PSM ] शैक्षणिक अहर्ता असणे गरजेचे असताना, नाका कान घशाच्या डॉक्टर राखी माने यांची महानगरपालिकेच्या अति महत्त्वाच्या आरोग्य अधिकारी पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ही बाब सोलापूर शहराच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्यामुळे पत्रकार सेफन शेख यांनी पंचनामा या लेखाच्या माध्यमातून उजेडात आणले आहे.
बातम्या लावू नयेत म्हणून डॉ. राखी माने यांनी सैफन शेख यांना पैशाचं आमिष दाखवलं शिवाय भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु सैफन शेख हे त्यांच्या कोणत्याही दबावाला तथा अमिषाला बळी पडले नाहीत. त्यामुळे प्लॅनिंग करून सापळा रचून सैफन शेख यांना गुरुवारी दुपारी साधारण तीन ते चार च्या दरम्यान सिव्हिल चौकातील कंकुबई हॉस्पिटल स्पिटल या ठिकाणी दुसऱ्या एका डॉक्टरांच्या माध्यमातून बोलावून घेण्यात आलं. त्यावेळी त्या ठिकाणी श्रीकांत गायकवाड या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने पत्रकार सैपन शेख यांना शिवीगाळ करण्यास सुरू केली व तो म्हणू लागला राखी माने या माझ्या मावस बहीण आहेत. त्यांच्या बातम्या लावू नकोस व लालावलेल्या बातम्या डिलीट कर. पत्रकार सैपन शेख यांनी प्रतिसाद न दिल्याने, ठरल्याप्रमाणे व डॉक्टर राखी माने यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकांत गायकवाड याने पत्रकार सैफन शेख याच्यावर खुनी हल्ला केला. या मारहाणीत सैफन शेख यांचे कपडे फाटले व त्यांच्या छातीत मार लागला. उपचारासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय [ सिविल हॉस्पिटल] मध्ये दाखल करण्यात आले आहे. घडलेल्या गंभीर घटनेची FIR सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे
राखी माने कोण ? व कशासाठी सोलापुरात आल्या
डॉक्टर राखी माने मूळच्या साताऱ्याच्या असल्याचं बोललं जात आहे. बेकायदेशीर विराजमान झालेल्या राखी माने यांची पतीही सोलापुरातच कार्यरत आहेत. त्यामुळेच राखी माने यांनी शैक्षणिक अहर्ता नसतानाही अति महत्त्वाच्या आरोग्याधिकारी पदावर स्वतःची नियुक्ती करूनच घेतली कशी ? या प्रतिनियुक्तीत मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे का? याबाबत ही आता सोलापूर शहरात उलट सुलट चर्चा चालू आहे.
श्रीकांत गायकवाड कोण?
हा श्रीकांत गायकवाड महानगरपालिकेत सारखाच फिरत असतो. तो काही नगरसेवकांच्या मांडीला मांडी लावून बसतो . तो तथाकथित ठेकेदार असल्याचं बोललं जातं. शिवाय डॉ. राखी माने यांच्या कार्यालयाच्या बाहेर पहारा देत थांबलेला असतो. त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय राखी माने यांना भेटता येत नाही. डॉक्टर राखी माने यांना कशासाठी भेटायचं आहे हे बाहेर थांबलेल्या गुंड श्रीकांत गायकवाडला सांगावं लागतं. श्रीकांत गायकवाडचं समाधान झालं तरच कार्यालयात राखी मानेची भेट होते. एकंदरीत गैर कारभार करण्यासाठीच राखी माने यांनी श्रीकांत गायकवाड याची नियुक्ती केली आहे. असं महानगरपालिकेतील सारेच कर्मचारी बोलत आहेत. आता यासाठी महानगरपालिकेतील CC TV फुटेज पाहावच लागेल.
पत्रकार संघाची भूमिका
पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आला आहे. या निवेदनात असं म्हटलं आहे की बेकायदेशीर विराजमान असणाऱ्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने व मारहाण करणारा श्रीकांत गायकवाड यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील असं निवेदनात मांडला आहे. याप्रसंगी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.