Commissioner hoisted the national flag in SMC

महानगरपालिकेत ध्वजारोहण
महानगरपालिकेत ध्वजारोहण

Commissioner hoisted the national flag in SMC

संपादक :’ सचिनकुमार जाधव

सोलापूर दिनांक 15 ऑगस्ट

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी सोलापूर महापालिका इंद्र भवन येथे महापालिका प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली – उगले यांनी ध्वजारोहण केलं.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

ध्वजारोहणानंतर तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर तिरंगा प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  27 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी महापालिकेका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये महापालिकेचे उपयुक्त आशिष लोकरे,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, उपअभियंता नीलकंठ मठपती, सहा अभियंता रामचंद्र पेंटर, विभागीय अधिकारी नंदकुमार जगधने, सहा.अभियंता प्रकाश दिवानजी, सफाई अधीक्षक अनिल चराटे, वैद्यकीय अधिकारी मंजरी कुलकर्णी,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल,बांधकाम विभागाचे अवेक्षक शकील शेख, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार तसेच आयुक्त यांच्या कार्यालयातील स्टेनोग्राफर परमेश्वर सुळगावकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान महापालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  ध्वजारोहण कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलांणी, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर,मुख्य लेखापरीक्षक रूपाली कोळी, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत-पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक,आयुक्त गिरीश पंडित, उपसंचालक नगररचना मनीष भिष्णुरकर, नगर सारिका अकुलवार, अग्निशामक विभाग प्रमुख राकेश साळुंखे,सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, सहा. कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी नितीन साके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केली.

अधिकाऱ्यांचा सन्मान
अधिकाऱ्यांचा सन्मान

 

15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्यदिनी महानगरपालिका आयुक्त शितल तेली उगले यांचे भाषण

    “मी सर्वप्रथम उपस्थित नागरिक, अधिकारी वर्ग, सेवक आणि पत्रकार बांधवाना भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देते. स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपल्या सर्वांसाठी मोठा आनंद सोहळा असतो. हे आपल्याला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक वीरांच्या बलिदान आणि त्यागातून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सोलापूरचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे. संपूर्ण देश पारतंत्र्यात असतानाही 04 दिवसांचे स्वातंत्र्य भोगण्याचे भाग्य ज्या चार हुतात्यांिनच्या बलिदानामुळे सोलापूरला मिळाले, ते आपण कधीही विसरू शकत नाही. मी येथे नमूद करु इच्छिते की, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या भीमा नदीवरील उजनी धरण मागील वर्षी क्षमतेच्या केवळ 60% च भरल्याने व उन्ह्याळयामध्ये वजा 60% पर्यंत पाण्याची पातळी खाली गेल्याने धरणातून दुबार आणि तिबार पंपींगद्वारे पाणी उपसा करुन शहरासाठी पाणीपुरवठा करावा लागला. तथापि यावर्षी वरुणराजाच्या कृपेमुळे उजनी धरण 100% क्षमतेने भरले आहे, हे आपणां सर्वांसाठी समाधानाची व आनंदाची बाब आहे. 

       सोलापूर शहर वासीयांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टिने अन्यन्यसाधारण महत्व असलेल्या 170 एम.एल.डी. च्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या कामासाठी दर आठवड्यास आढावा घेऊन काम वेळेत पूर्ण होईल. याबाबत पाठपुरावा करणेत येत असून, आतापर्यंत उजनी धरणातील जॅकवेलचे 73% काम पूर्ण झालेले आहे. एकूण 110 किलोमिटर घालण्यात येत असलेलया पाईपलाईन पैकी 98 किलोमिटर पाईपलाईन घालण्यात आले आहे, आणि 50 किलोमिटर हायड्रॉलिक टेस्टिंग पूर्ण झालेले आहे. नोव्हेंबर-2024 पूर्वी हे काम पूर्ण करण्याचा आमचा कसोशीचा प्रयत्न आहे. 

         शहरातील पाणीपुरवठा व ड्रेनेज पायाभूत सुविधांतर्गत केंद्रसरकाच्या अमृत-1 योजनेअंतर्गत एकूण 246 किलोमिटर ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली असून, देसाई नगर येथे 20 एम.एल.डी. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात असून, हा प्रकल्प ऑक्टोंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे तसेच नगरोत्थान योजनेअंतर्गत एकूण 208 किमी ड्रेनेज लाईन टाकणे देगाव येथे 49 एम एल डी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादी अंतभूत असलेल्या एकूण रक्कम रुपये 434 कोटी इतक्या प्रकल्पास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रियेअंती लवकरच कामास सुरुवात करण्यात येत आहे त्याचप्रमाणे अमृत दोन योजनेत शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा सुधारणा योजना डीपीआर किंमत रक्कम रुपये 883 कोटी मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे याशिवाय महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील महत्त्वाच्या 20 नाल्यांची पर्जन्य जलवाहिन्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे त्यानुसार रक्कम रुपये 99 कोटीच्या प्रस्तावास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदास प्रक्रिये अंती लवकरच कामात सुरुवात होईल या सर्व प्रकल्पामुळे शहरातील पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्था अधिक उत्तम होण्यास मदत होईल असा विश्वास मला वाटते.

      भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला प्रमुख शहरांच्या श्रेणीत देश पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला आहे पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

        पी.एम ई-बससेवा योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी 12M (Standard)- 30 आणि 9 M(Midi) -70 अशा एकूण 100 ई-बसना मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार डेपो इन्फ्रा चार्जिंग इन्फ्रा व बिहाइंड मीटर इन्फ्रा पायाभूत सुविधा करिता निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून सोलापूर शहरवासी यांना या माध्यमातून विविध मार्गावर बससेवेचा लाभ लवकरच उपलब्ध होईल याबद्दल मी आशा व्यक्त करते.

         सोलापूर महानगरपालिकेच्या दिव्यांग व महिला बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत मनपाकडून दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत देण्यात येणारा उदरनिर्वाह भत्ता वार्षिक 12 हजार रुपये देण्यात येत असून एकूण 2250 लाभार्थी याचा लाभ घेत आहे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या 160 दिव्यांग विद्यार्थ्यांना नुकतेच साहित्य वाटप करण्यात आले त्यामध्ये तीन चाकी सायकल 9 कुबड्या 20 सुगम्य केन 19 ब्रेल किट 11 काना पाठीमागील श्रम नियंत्रण 88 सीपी चेअर विथ कमोड 26 विल चेअर 46 रो लेटर ३० स्मार्टफोन 24 अशाप्रकारे एकूण 286 साहित्य साधने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.

 

        महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून शहरातील विद्यार्थी व महिलांना एम एस सी आय टी टॅली बँकिंग फॅशन डिझाईनिंग ब्युटी पार्लर ट्रेलरिंग असे विविध कोर्स मोफत दिले जातात यावर्षी विद्यार्थी व महिला कडून प्रशिक्षणासाठी तब्बल दोन हजार ऑनलाईन अर्ज आलेले असून त्या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे याशिवाय मनपा शाळेतील मुला मुलींना मोफत वाहतूक पास सुविधा देण्यात येत आहे.

        स्वच्छ भारत अभियान 2023 मध्ये सोलापूर शहराने आपल्या स्वच्छतेच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा केली असून पूर्वीच्या 88 व्या क्रमांकावरून राष्ट्रीय स्तरावर 63 व्या आणि पूर्वीच्या 17 व्या क्रमांकावरून राज्यस्तरावर चौदाव्या क्रमांकावर पोचले आहे. शहराने थ्री स्टार कचरा मुक्त रेटिंग देखील मिळवले आणि सलग तिसऱ्यांदा ओडीएफ ++ स्थिती राखली. कचरा संकलन आणि वाहतूक करण्यासाठी 35 सीएनजी वाहने आणि सहा सीएनजी रेफ्युज कॉम्पॅक्टर खरेदी करण्यात आले असून आयटीसी आधारित घरोघरी कचरा संकलन निरीक्षण प्रणाली लागू केली आहे.

        पालिकेकडून शहरातील धूळ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून या अंतर्गत सुमारे 46 कोटी रुपयांची रस्ते सुधारणा दुभाजक व चौक सुशोभीकरण हरित पट्टे तयार करणे पाण्याचे कारंजे बनवणे अशी कामे हाती घेण्यात आली असून सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये आज पर्यंत एकूण 25 किलोमीटरचे 40 रस्ते आठ सुशोभीकरण ठिकाणी 13 सीएनजी वाहने घेण्यात आली असून आणखी चार सीएनजी वाहने घेणे रस्ते सुधारणा व 25 किलोमीटर यामध्ये झाडे लावणे प्रास्तावित आहे. मनपाच्या माय सोलापूर मोबाईल ॲप्लिकेशन वरून विविध प्रकारच्या 46 ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करून देत आहे त्याचबरोबर परिवर्तन सारख्या माध्यमातून नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी हक्कांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन इत्यादी सेवा सुरळीत व सुरक्षित अबाधित राखण्याकरिता इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर कार्यान्वित झाले आहे यामध्ये सीसीटीव्ही एलईडी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणीपुरवठा वितरण काढा प्रणाली शहरातील ड्रेनेज अग्निशामक विभाग पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकाच छता घालून देखरेख करण्यात येत आहे.

        2024 25 साठी वार्षिक मालमत्ता कराची बिले एसएमएस द्वारे नागरिकांना देण्यात आली असून नागरिकांच्या सोयीसाठी फोन पेटीएम सह 46 ऑनलाईन एप्लीकेशन द्वारे मालमत्ता कर भरता येणार आहे. या सर्व सुविधांच्या माध्यमातून मिळकत कर भरून शहरातील नागरिकांनीही शहर विकासातील आपले योगदान नोंदवावे व मनपा सहकार्य करावे असे मी आवाहन करते.

        शहर विकासाचा हा डोलारा ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवावर उभा आहे त्यांच्या जिव्हाळ्याच्या अनेक बाबी आजवर पूर्ण करण्यात आल्या आहेत. सोलापूर महानगरपालिकेतील वर्ग एक ते चार संवर्गातील 155 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली मागासवर्गीय असेल पुणे मार्फत 51 कॅडर साठी पंधरा वर्षाचा प्रलंबित बिंदू नामावल्यांना मान्यता जेष्ठता यादी गोष्टींचा भावेश होतो याचाच परिणाम सरकारच्या निर्देशानुसार 32 संवर्गातील 340 कायम पदासाठी भरती पूर्ण झाली आहे.

        पात्र वारसांना लाड पागे समिती अंतर्गत नियुक्तीची प्रक्रिया न्यायालयीन स्थगितीमुळे तात्पुरती थांबली होती परंतु सदर स्थगिती उठल्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण सुरू झाली व मला सांगताना आनंद होतो की 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यांचे अष्टयात्तर नियुक्ती आदेश निर्गमित झाले. आपणा सर्वांना विधीतच आहे की जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य सत्यात आणणे व शहरवासीयांना मूलभूत सेवा सुविधा देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे शहराची निकड लक्षात घेता शासनाच्या विविध पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पामध्ये प्रस्ताव सादर केलेले असून त्यासाठी मनपाचा स्वहिस्सा भरणे ही पूर्व अट आहे यास्तव मनपाच्या मर्यादित उत्पन्नाच्या साधनांमुळे उत्पन्न व खर्च याचा वेळोवेळी ताळमेळ घालून प्रशासकीय स्तरावर खर्चाची निर्णय घेणे कर्मप्राप्त ठरते ही बाब लक्षात घेता मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त सेवानिवृत्त याच प्रमुखांचा भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी मनपाच्या सुमारे 360 कर्मचाऱ्यांना 7.7 कोटी अर्जित रजेचे तर परिवहनच्या 52 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 31.5 लाख तोच दानाचे वितरण करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर मी मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुढील प्रमाणे महागाई भत्ता देण्याची घोषणा करते. सोलापूर महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त सेवकांना तसेच माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांना महागाई भत्त्यात दर सध्या 26 टक्क्यावरून 5% इतकी वाढ करून ३१ टक्के करण्यात येत आहे.

         सध्या मनपामध्ये कार्यरत रोजंदारी सेवकाच्या दरामध्ये दैनंदिन 40 रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे तसेच अंगणवाडी बालवाडी शिक्षकांच्या मानधनात पाचशे रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मी आपल्याला आश्वासन देते की आपल्या शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत सोलापूर हे स्वच्छ सुंदर आणि सर्वांसाठी सुरक्षित सर बनवण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. आपल्या सहकार्याने आम्ही आपले शहर आणखी उन्नत करण्यासाठी पाणीपुरवठा ड्रेनेज रस्ते दिवाबत्ती आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रात उत्तम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत.

       आजच्या या दिवशी आपण आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची जाणीव ठेवून देशाच्या उन्नतीसाठी काम करूया स्वातंत्र्य हे फक्त अधिकार नाही तर एक मोठे कर्तव्य ही आहे आपल्या भावी पिढीला एक उज्वल्य भविष्य देण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया.

       आजच्या या दिवशी आपण आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची जाणीव ठेवून देशाच्या उन्नतीसाठी काम करूया स्वातंत्र्य हे फक्त अधिकार नाही तर एक मोठे कर्तव्य ही आहे आपल्या भावी पिढीला एक उज्वल्य भविष्य देण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया.

        आपण सर्वजण एकत्रितपणे काम करून सामूहिक प्रयत्नातून आपल्या सोलापूर शहराला एक स्वच्छ सुंदर व आदर्श शहर बनवूया. 

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *