
Journalists protest against corrupt officials on Independence Day
आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात पत्रकार सैपन शेख यांचं स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलन व उपोषण
संपादक:- सचिनकुमार जाधव
सोलापूर दिनांक 15 ऑगस्ट
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने व सिविल सर्जन डॉक्टर सुवास माने हे पती पत्नी आहेत. राखी माने ह्या आर्थिक वशिला लावून योग्य पदवी नसताना सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्याधिकारी पदावर विराजमान झाल्या. त्याचप्रमाणे त्यांचे पती डॉक्टर सुहास माने यांनी देखील गैरकारभार केल्याच्या बातम्या पत्रकार सफन शेख यांनी मालिका स्वरूपात लावल्या होत्या व आणखीनही लावत आहेत. त्याचा राग मनात धरून या डॉक्टर दांपत्यानं प्लॅनिंग करून पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे. झालेल्या गुन्ह्य़ाची सखोल चौकशी करा आम्ही दोषी आढळलं असेल तर आमच्या कारवाई करा अन्यथा आमच्यावर खोटी कारवाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा या रास्त मागणीसाठी पत्रकार सैफन शेख हे 15 ऑगस्ट रोजी नैसर्गिक न्याय मिळावा या हेतूने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट या ठिकाणी उपोषण व धरणे आंदोलन करीत आहेत.
उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर, डॉ. सुहास माने आणि डॉ. राखी माने यांच्या विरोधात आज, 15 ऑगस्ट पासून पत्रकार सैफन शेख यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु; यानंतरही कारवाई न झाल्यास भीक मांगो आंदोलनाचा इशारा
आंदोलन करणाऱ्या पत्रकार शेख यांच्या मागण्या
1) सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने यांच्या गैरकारभाराची कसून चौकशी
2) सोलापूर महानगरपालिकेतील डॉ. राखी माने यांची आरोग्य अधिकारी पदासाठी शैक्षणिक अर्हता नसताना केलेली प्रतिनियुक्ती रद्द करा.
3) उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी डॉ. राखी माने यांची चुकीच्या पद्धतीने प्रतिनियुक्ती केल्याने त्यांचे निलंबन करून त्यांना चौकशीअंती बडतर्फ करा.
4) पत्रकार म्हणून काम करीत असताना माझ्याविरुद्ध हेतुपुरस्सर ५० लाखाची खंडणी, विनयभंग आणि 2 कोटीची खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केलेल्या फिर्यादींच्या. मालमत्तेची चौकशी तसेच त्यात माझ्याविरुद्ध तथ्य आढळल्यास कारवाई होणे अन्यथा ते गुन्हे मागे घ्यावेत.
तसेच यानंतरही डॉ. राखी सुहास माने यांची प्रतिनियुक्ती रद्द न केल्यास सोलापुरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सोलापूर शहरात फिरून पत्रकार सैफन शेख यांच्याकडून ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे. या ‘भीक मांगो’ आंदोलनातून जमा झालेली रक्कम ही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांना देण्यात येणार आहे.
