A case of fraud has been registered against municipal officials
सोलापूर महानगरपालिका बांधकाम विभागातील निलंबित अधिकाऱ्यांवर 420 चा गुन्हा दाखल
“सोलापूरच्या महसूल विभागातील सावळा गोंधळ मूलभूत कागदपत्रे नसताना शेती खरेदी खरेदीदार व संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच होणार कारवाई”
संपादक:- सचिनकुमार जाधव
सोलापूर दिनांक 18 ऑगस्ट
सोलापूर महानगरपालिकेतील अवैध बांधकाम परवाना देणारे उपाभियंता 1]झाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी (रा. स्क्वेअर डीलक्स आपारमेंट अपार्टमेंट बसवेश्वर नगर सोलापूर) 2]श्रीकांत अण्णा खानापुरे (रेल्वे लाईन रेल्वे स्टेशन जवळ सोलापूर) 3]आनंद वसंत क्षीरसागर( सुंदरम नगर विजापूर रोड) 4] शिवशंकर वसंत घाटे (27 रेवन सिद्धेश्वर नगर सोलापूर) या चार अधिकारी कर्मचाऱ्यांवर बेकायदेशीर ऑफलाईन बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिका बांधकाम विभागातील उपाय अभियंता नीलकंठ शिवाजी मठपती यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर या ठिकाणी फसवणुकीचा नॉन बेलेबल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात सविस्तर हकीकत अशी की……
बांधकाम परवान्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदाराने स्वतःच्या मिळकतीवर बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेकडे रीतसर परवाना मागितला होता. महानगरपालिकेमध्ये बांधकाम परवाना हा ऑनलाइन दिला जातो. हे बहुधा नागरिकांना माहीत असतंच असं नाही परंतु महानगरपालिकेतील साऱ्याच अधिकाऱ्यांना हे माहित आहे. असं असताना नाईकवाडी यांच्यासह आवश्यक खानापुरे क्षीरसागर यांनी स्वतःकडे बांधकाम परवाना देण्याचे अधिकार नसतानाही परस्पर ऑफलाइन पद्धतीने बांधकाम परवाने दिले. यातून महानगरपालिकेची तर फसवणूक झालेत शिवाय अर्जदाराची फसवणूक झाली. हे प्रकरण उजेडात येऊ लागतात संबंधित आरोपींनी बांधकाम परवान्याच्या कागदपत्राची परस्पर विल्हेवाट लावली. ज्यावेळी हे प्रकरण आयुक्तांच्या निदर्शनास आलं त्यावेळी त्यांना निलंबित करण्यात आलं . जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत हा गुन्हा घडला आहे . त्या गुन्ह्याची तक्रार बांधकाम विभागातील उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी 15 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणात तात्कालीन बांधकाम विभागातील प्रमुख लक्ष्मण चलवादी यांचीही सखोल चौकशी होणे अपेक्षित असताना. त्यांच्यावर मात्र हेतू पुरस्कृत कारवाई करण्याचं टाळलं जात असल्याचं महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांतून बोलले जात आहे.
मुळात बांधकाम विभागातील उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी तक्रार नोंदवण्यासाठी 15 ऑगस्ट या तारखेची का निवड केली? याच्यावरही उलट सुलट चर्चा चालू झाली आहे. मोठ्या मगरमच्छला सोडण्यासाठी बारके मासे गळ्याला लावण्याचे काम चालू आहे का असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत.
फक्त बैठका घेण्यात व्यस्त असणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी आता खऱ्या अर्थानं आपली सेवा बजावली पाहिजे व सोलापूरकरांच्या हिताचे महानगरपालिकेच्या हिताचेच निर्णय घेतले पाहिजेत आणि त्याकरताच मीटिंग घेतल्या पाहिजेत.