Vinkar Economic Development Corporation

विणकर मेळावा
विणकर मेळावा

Vinkar Economic Development Corporation

विणकर आर्थिक विकास महामंडळासाठी ५०० कोटी निधीची तरतूद  करण्यास भाग पडणार – कॉ. आडम मास्तर

संपादक:- सचिनकुमार जाधव

सोलापुरात विणकारांचा मेळावा संपन्न

 

सोलापूर दि.५

महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच विणकरांसाठी विणकर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा १६ मार्च २०२४ रोजी केली. परंतु या महामंडळासाठी अत्यंत तुटपुंजे असे निधीची तरतूद आहे. यामुळे या महामंडळाचा विणकरांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ शकत नाही. आज महाराष्ट्रात साधारणत: लाखोंच्या संख्येने विणकर आहेत. त्या विणकरांचा मुख्य व्यवसाय हातमाग हेच आहे. हातमाग व्यवसाय हा घरगुती आणि कुटुंबातील सर्वांनी मिळून करण्याचा व्यवसाय आहे. उत्पादनाप्रमाणे मजुरी मिळत नाही. त्यामुळे यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही. शासनाने २ जून २०२३ रोजी विणकरांसाठी उत्सव भत्ता महिलांसाठी १५ हजार आणि पुरुषांसाठी १० हजार ची घोषणा केली होती. मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ सोलापुरातल्या विणकरांना मिळालेला नाही. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा व सल्लामसलत करून उत्सव भत्ता मिळवून देण्यासंबंधी तसेच कामगार आयुक्त नागपूर येथे प्रत्यक्ष भेटून चर्चा करूनही सोलापूरातील विणकर उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले. हा त्यांच्यावरच्या सरकारचा अन्याय दूर करण्यासाठी विणकर आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यास महाराष्ट्र शासनाला भाग पाडू असा वज्र निर्धार माधव नगर येथील विणकरांच्या मेळाव्यात करण्यात आला.

गुरुवार दि. ५ सप्टेंबर  रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापूरातील विणकर व हातमाग कामगार यांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्या संदर्भात हातमाग कामगार चंद्रकांत चीटमिल यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर यशोदा दंडी, गजेंद्र दंडी, बाळकृष्ण मल्याळ, वीरेंद्र पद्मा, नागनाथ मादगुंडी आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना कॉम्रेड आडम मास्तर म्हणाले, विणकरांसाठी सामाजिक सुरक्षा व त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सवलती नाहीत. सध्या उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत १० लाख व परदेशात २० लाख रुपये अशी शिष्यवृत्ती मिळते परंतु हि अत्यल्प असून यात लक्षणीय प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे. तसेच देशामध्ये आज ३७ कोटी असंघटीत कामगार असून त्यांना कायद्याचे कोणतेच संरक्षण नाही. अक्षरशः हे लोक नरक यातना भोगत आहे. तसेच ७८ लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून किमान प्राथमिक गरजासुध्दा भागवू शकत नसल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता यांना ८०० ते २५०० रुपयापर्यंत पेन्शन मिळते. गेल्या १० वर्षापासून पेन्शन वाढवा यासाठी प्रचंड आक्रोश वाढलेला आहे. कित्येक सेवानिवृत्तधारक आपल्या टाचा घासून दगावले आहेत. तरी सुध्दा मायबाप सरकार दया येत नाही. हि वस्तुस्थिती लक्षात घेऊन विणकर आणि सेवानिवृत्तीधरकारांच्या समस्या घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जंतरमंतर येथे लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिले.

विणकर व हातमाग कामगारांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांचा यथोचित सत्कार करून आगामी विधान सभा निवडणुकीत कोणत्याही अमिषाना व प्रलोभनांना बळी न पडता प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा एकमुखी निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला.

प्रास्ताविक विजय हरसुरे यांनी केले.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण मल्याळ यांनी केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन बेलियार,अंबादास गडगी, सिद्राम गडगी,प्रशांत विटे,सनी कोंडा,प्रकाश कुऱ्हाडकर,नागराज मादगुंडी,बालाजी गुंडे,गोपाळ जगलेर,श्रीनिवास तंगडगी,राम मरेड्डी, अनिल घोडके आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *