Responsible action by the police
पोलिसांच्या रूपाने विघ्नहर्ता आला धावून
संपादक:- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309
सोलापूर दिनांक 17
विजापूर रोड येथील गणेश मिरवणुकीत सहभागी झालेल्या सपना विनोद कसबे या महिलेची पर्स हरवली, त्यामध्ये मोबाईल व रोख रक्कम पाच हजार रुपये होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेला मुद्देमाल महिलेस ओळख पटल्यानंतर देण्यात आला.
गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या गणेश उत्सवाची सांगता मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्यात आली. देशभरात श्री गणेश विसर्जन करिता मोठ्या थाटामाटात वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात झाली होती. या भक्तीमय वातावरणात सहभागी होण्यासाठी अबाल वृद्धांनी गर्दी केली होती. विजापूर रोड येथील संभाजी तलाव परिसरात श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. घरगुती श्री गणरायांच्या मूर्ती त्याचप्रमाणे छोट्या-मोठ्या मंडळाच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.
सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर त्याचबरोबर विसर्जन ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शहरात पेट्रोलिंग व गस्ती पथक नेमण्यात आले होते. पोलिसांच्या बंदोबस्तामुळेच शहरात गणेश विसर्जन सुरळीत पार पडला.
विजापूर रोड येथील मिरवणूक पाहण्यासाठी मंगळवार दि. 17/09/24 रोजी रात्री 08.00 वाजता सपना विनोद कसबे ही महिला तिच्या लहान मुलासोबत विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आयटीआय पोलीस चौकी जवळ आली होती, त्याच वेळेस त्या महिलेची पर्स गर्दीच्या ठिकाणी हरवली. हरवलेल्या पर्स मध्ये व्हिवो कंपनीचा मोबाईल किंमत रुपये पंचवीस हजार आणि रोख रक्कम 5000 असा मुद्देमाल होता. सदरची पर्स एबल क्राईम स्ट्रायकिंग 3 वरील अंमलदार पो. ह. 1371 वाघमारे आणि पो. ह. शेख यांना सापडली असता सदर महिलेस आय टी आय चौकी येथे फोन करून बोलावून घेतले आणि ओळख पटवून सदरचा मुद्देमाल त्या महिलेच्या ताब्यात देण्यात आला.
आपल्या लहान मुलांसह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलेवर विघ्न आलं होतं परंतु पोलिसांच्या रूपाने विघ्नहर्ता आला धावून.
अशा मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या ठिकाणी हरवलेली पर्स ज्यामध्ये मोबाईल व रोख रक्कम होती ती त्या महिलेस तात्काळ मिळाली त्यामुळे या महिलेस मिळालेला आनंद व समाधान मोजता येणार नाही. खरोखर याचं श्रेय त्या पोलिसांना जातच, शिवाय खाकी वर्दीलाही हे श्रेय द्यावा लागेल.