Police alert in Solapur city
शहर पोलिसांची सतर्कता… चोरी दरोडेखोरीची घटना होण्यापूर्वीच शहर पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या
संपादक:- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309
# कर्णिक नगर या ठिकाणी चोरी दरोडाच्या उद्देशाने लपवून बसले होते
# चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले पर राज्यातील अट्टल गुन्हेगार शहरातील लॉजवर होते मुक्कामाला
# कर्णिक नगर सह शहरातील नागरिकांवरील मोठं संकट टळलं
सोलापूर दिनांक 18
सोलापूर शहरांमध्ये दिनांक 15 सप्टेंबर व 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पहाटेच्या वेळी सलग दोन दिवस घरफोडी मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले. शहर गुन्हे शाखेच्या वतीने तांत्रिक पुरावे गोळा करून पर राज्यातील गुन्हेगारास 1]राजासिंह आजादसिंह बडोले वय वर्ष 23, राहणार 98 /1 मुक्काम उमर टी, पोस्ट बडवाडी, वार्डा नंबर 3 तालुका – वरला, जिल्हा – बडवानी राज्य मध्य प्रदेश 2] अवतारसिंह महुसिंह टाक वय 31 वर्ष ,राहणार मुक्काम उमरटी, पोस्ट बडवाडी, तालुका – वरला, जिल्हा – बडवाणी, राज्य मध्य प्रदेश. 3] कुलदीपसिंह ज्योतसिंह बडोले उर्फ भोंड व 29 वर्ष, राहणार मुक्काम सोरापाडा, पोस्ट अक्कलकुवा,तालुका -अक्कलकुवा जिल्हा – नंदुरबार, राज्य महाराष्ट्र यांना संशयित म्हणून ताब्यात घेतला आहे.
यात हकीकत अशी की……
सोलापूर शहरात 15 सप्टेंबर व 16 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सलग दोन दिवस घरपोडी मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेटी देऊन त्या ठिकाणाहून तांत्रिक पुरावे गोळा केले त्या अनुषंगाने घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरून संशयित तीन इसम हे लाल काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर चोरी करण्याचे उद्देशाने कर्णिक नगर जवळ दाबा धरून बसलेले आहेत अशी माहिती कळाली. माहिती मिळतात पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी तात्काळ कर्णिक नगर हे ठिकाण गाठलं आणि शिताफीनं तीन संशयित इसम नावे1) राजसिंह आदालसिंह बडोले.2) अवतारसिंह महुसिंह टाक 3) कुलदीपसिंह ज्योतसिंह बडोले उर्फ भोंड यांना ताब्यात घेतलं. पोलीस पथकांने सखोल चौकशी करून खाकी दाखवताच तिनंही आरोपींनी तोंड उघडलं……
……. पहाटेच्या वेळी एका चोरीच्या मोटरमोटरसायकलवर ट्रिपल सीट जाऊन घरफोडी व चोरी करत करते असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून सोलापूर शहरातील दोन घरफोडीचे गुन्हे व एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा अशी तीन गुन्हे उघडकीस येऊन त्यामध्ये एकूण 54 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल व घोरपडी करण्यासाठी वापरलेली कटावणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या तिन्ही आरोपीं विरोधात माहिती घेतली असता ते आंतरराज्य सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध दिल्ली व इतर राज्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
हे तिन आरोपी सोलापूर शहरात दिनांक 14 सप्टेंबर रोजी चोरी करण्याच्या उद्देशाने आले असून तिघेजण एका लॉजवर राहत होते त्यामुळे सर्व लॉज मालकांना पोलिसांच्या पतीने आव्हान करण्यात येत आहे की असे कोणी संशयित अनोळखी इसम लॉजवर राहण्यास आले असल्यास त्याबद्दल सोलापूर शहर पोलिसांना माहिती द्यावी.
या तीन सराईत गुन्हेगारांना पकडण्याची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दिपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार महेश शिंदे, अनिल जाधव ,अजय गुंड, कुमार शेळके, प्रवीण शेळकंदे ,चालक बाळू काळे यांनी केली आहे.