Special Honor Awards to Ex-Servicemen and his family
विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी 27 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
सोलापूर, दिनांक 25
विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व देशाची प्रतिष्ठा वाढविणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कारांचे निवड करण्याकरीता दि. 27 सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय, सोलापूर येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
विशेष गौरव पुरस्कार म्हणून एकरकमी 10 हजार व 25 हजार रुपये प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्काराकरिता राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर क्षेत्राातील अतिउत्कृष्ट कामगिरी पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर,जळीत, दरोड, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश, राज्याची प्रतिष्ठ वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य इत्यादी यांना तसेच सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व आय.आय.टी, आय.आय.एम, ए.आय.आय.एम.एस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचेकडे कागदपत्रासह दिनांक 27 सप्टेंबर 2024 पुर्वी अर्ज करावेत. विशेष गौरव पुरस्कारासाठी आवश्यक असणारा विहीत नमुन्यात फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे उपलब्ध आहेत तरी संबंधितांनी कार्यालयाशी विनाविलंब संपर्क साधावा.
वैयक्तीक अर्ज, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध (डी.डी 40) विहित नमुना फॉर्म, पाल्य शिकत असलेबाबतचा बोनाफाईड दाखला, मार्कशिटची सांक्षांकित प्रत, माजी सैनिक, विधवेचे ओळखपत्राची छायांकित प्रत, डिसचार्ज बुक मधील फॅमिली डिटेलच्या पानाची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड छायांकित प्रत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, वर्तमानपत्रात प्रसिध्दी, फोटो इत्यादी बाबतची कागदपत्रे सादर करावीत
मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही .अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दुरध्वनी क्रमांक 0217-2992366 संपर्क साधावा असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी कळविले आहे.