Solapur Pune Mumbai air travel approved
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई सफर झाला मंजूर
उद्योग व्यवसायाला मिळणार चालना
अक्कलकोट पंढरपूर व तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती
महायुती सरकारची सोलापूरकरांना विशेष भेट
सोलापूर विकास मंचाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आले यश
हवाई प्रवासासाठी शासनाची मंजुरी
संपादक :- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309
सोलापूर दिनांक 14
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासा करिता महाराष्ट्र शासनाने एक वर्षासाठी Viability Gap Funding (VGF) मंजूर केली आहे. राज्य सरकारने उडान (Regional Connectivity Scheme – RCS) अंतर्गत ही योजना पुढील एक वर्ष किंवा सोलापूर विमानतळावरून RCS सेवा सुरू होईपर्यंत 100% VGF मंजूर केली आहे. या निर्णयामुळे सोलापूर विमानतळावरून पुणे व मुंबईसाठी प्रवास अधिक सोपा व किफायतशीर होणार आहे.
साधारण नागरिकांना परवडणाऱ्या विमान प्रवासासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१६ मध्ये उडान योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातील काही विमानतळांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले असून, सोलापूर विमानतळ देखील त्याचा एक भाग आहे. तथापि, सोलापूर विमानतळावर अद्याप RCS अंतर्गत उड्डाणे सुरू नाहीत, त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते पाठबळ देण्यात येणार आहे.
सोलापूर विमानतळावरून हवाई सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे VGF देण्याची विनंती केली होती. या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने 100% Viability Gap Funding मंजूर केली आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई या मार्गावर प्रवास सुरू होण्यास महत्त्वाची चालना मिळणार आहे.
अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरात हजारोच्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. पुणे,मुंबई,ठाणे या भागातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. रेल्वे, ST बस,प्रायव्हेट गाड्या करून भाविक या ठिकाणी येतात. आता या भाविकांनाही या विमानसेवेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. एका दिवसात दर्शन घेऊन पुन्हा आपल्या घरी जाता येणार आहे. या विमानसेवेमुळे साहजिकच भाविकांची सोय होणार आहे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील उद्योग व्यवसायाला गती मिळणार आहे. एकंदरीत महायुती सरकारच्या वतीने विमानसेवेचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा फायदा उद्योग व्यवसायांबरोबरच तीर्थक्षेत्रासाठी ही महत्त्वाचा ठरणार आहे. पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक येत असतात. तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर हे तर वर्षातील 365 दिवस भक्तांनी भरलेलं असतं. महाराष्ट्रासह देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. म्हणजेच अक्कलकोट, पंढरपूर व तुळजापूर या तीर्थक्षेत्रांचा दर्शन घेण्यासाठीचा लागणारा वेळ नाहक खर्च विमानसेवेमुळे वाचणार आहे.
सोलापूर जिल्हासहित विजापूर, धाराशिव आणि लातुर जिल्हातील किमान एक कोटी जनतेच्या विकासात एक मोठा टप्पा आहे. विमानतळावरून प्रवास सुरू झाल्यानंतर उद्योग, व्यवसाय, पर्यटन, आणि इतर क्षेत्रांना चालना मिळेल.
सोलापुरातील हवाई प्रभास सुरू होण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या वतीने विविध स्तरावर आंदोलना केले होते. सोलापूर विकास मनसेच्या आंदोलनाला शहर जिल्ह्यातील जनतेचाही पाठिंबा मिळाला त्यामुळे सोलापूर विकास मंचाच्या आंदोलन हे जन आंदोलन म्हणून पुढे आलं. त्यांच्या यश संघर्ष पूर्ण लढ्याला अखेर यश आलं आणि अनेक वर्षांपासून रखडलेली विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली
शासन निर्णय