Happy Diwali to Solapur Municipal Corporation employees
सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
संपादक :- सचिनकुमार जाधव
सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दायित्वाची मोठी रक्कम महानगरपालिकेकडे प्रलंबित होती. कडक शिस्तीचे धोरण अवलंब करीत, महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारून दायित्व कमी करण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. दायित्व कमी करण्यासाठी प्राधान्यक्रमानुसार मक्तेदारांची विकास कामाची प्रलंबित देणे देणे कर्मचाऱ्यांचे प्रलंबित रक्कम देणे याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
सोलापूर दिनांक 23
प्रतिवर्षी सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सहानुग्रह अनुदान देण्यात येतो. यंदाच्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शितल तेली उगले यांनी कर्मचाऱ्यांना 3300 रुपये सानुग्रह अनुदान दिला आहे. त्याचप्रमाणे सण अग्रीम म्हणून रक्कम रुपये 9 हजाा मंजूर करून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे.
पेन्शनर सेवकांचे सेवानिवृत्ती नंतरचे देय असलेले अर्जित रजा रक्कमेचे एकूण 910 सेवानिवृत्त सेवकांचे एकूण र.रू.18.29 कोटी इतकी रक्कम थकीत होती. यामधील 332 पेन्शनरांची र.रू.8.97 कोटी इतकी रक्कम माहे ऑगस्ट-2024 पूर्वी आदा करण्यात आलेली होती. तद्नंतर माहे 15 ऑगस्ट 2024 स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून सुमारे 242 पेन्शनरांची थकीत अर्जित रजेची र.रू.7.76 कोटी इतकी रक्कम आदा करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीमध्ये उर्वरीत पेन्शनरांची माहे मार्च-2024 पर्यंत थकीत असलेल्या प्रतिक्षायादीमधील सुमारे 132 सेवकांना त्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाची एकूण र.रू.5.10 कोटी रक्कम आता अदा करण्यात येत आहे. यामुळे सेवानिवृत्त सेवकांना देखील दिवाळी निमित्त महानगरपालिके तर्फे मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, यापुढेही अर्जित रजेच्या प्रतिक्षा यादीमधील उर्वरीत पेन्शनरांना लवकरात लवकर त्यांच्या देय रकमा महानगरपालिकेकडून देण्यात येईल. यापुढेही पेन्शनरांना त्यांच्या देय रकमा वेळच्यावेळी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.अशी माहिती मुख्य लेखाधिकारी महानगरपालिका रत्नराज जवळगेकर यांनी दिली.