BJP candidate for Solapur City Central Assembly Devendra Kothe

BJP candidate for Solapur City Central Assembly Devendra Kothe

सोलापूर शहर मध्य विधानसभा देवेंद्र कोठे यांना भाजपची उमेदवार

संपादक:- सचिनकुमार जाधव

📞 📲 738 5352 309 

सोलापूर दिनांक 26

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने शनिवारी उमेदवारांच्या नावाची दुसरी यादी जाहीर केली.

या दुसऱ्या यादीमध्ये सोलापुरातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाने विश्वास दाखवला असून त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.

सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे गट यांच्यात मतदार संघ स्वतःकडे ठेवण्यासाठी रस्सीखेच चालू होती. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी बंड करण्याच्या तयारीत होते. मात्र भारतीय जनता पक्षाने अशा बंडला न जुमानता शहर मध्य मतदार संघ स्वतःकडे ठेवून घेतला.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना भारतीय जनता पक्षाची शहर मध्य मधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

उमेदवारी जाहीर होतात नवी पेठेतील त्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *