Just politics. In Solapur the Shivsena [Shinde gat] is under the Swarajya Party

Just politics. In Solapur the Shivsena [Shinde gat] is under the Swarajya Party

कारण राजकारण सोलापुरातील शिंदे यांची शिवसेना स्वराज्य पक्षाच्या छत्रछायेखाली

संपादक :- सचिनकुमार जाधव

📞 📲 738 5352 309 

सोलापूर दिनांक 29
सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उघड उघड मित्रपक्ष असलेल्या भाजप विरोधात बंड पुकारण्यात आला आहे. शिवसेनेला शहरात एक ही जागा सुटली नाही म्हणून. शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी मनीष काळजे, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, उमेश गायकवाड हे चार जिल्हाप्रमुख पुणे येथे 28 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी या चौघांसह आणि इतर कार्यकर्ते सोलापुरात विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सोलापूर जिल्हा कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. परंतु या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची संख्या इतर पक्षांपेक्षा जास्त आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 11 विधानसभा मतदार संघ आहेत. अक्कलकोट मध्ये भाजपचे विधान आमदार सचिन कल्याणशेट्टी आहेत. तो मतदारसंघ यंदाच्या तिकीट वाट पाहत भाजपला मिळाला आहे.  शहर आणि ग्रामीण भागात व्यापलेला  उत्तर सोलापूर हा मतदार संघ भाजपकडे होता, भाजपकडे आहे. या ठिकाणचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भाग असलेला दक्षिण सोलापूर मतदार संघ भाजपकडे होता आणि आताही भाजपकडे आहे या मतदारसंघातील विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. शहर मध्य हा मतदारसंघ लागोपाठ तीन टर्म कॉंग्रेस कडे राहिला आहे. गेल्या दोन विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात AIMIM दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
आणि याच मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तात्कालीन नगरसेविका मोहिनी पत्की यांनी निवडणूक लढवली होती. जवळपास 25 हजारापेक्षा जास्त मत  त्यांनी मिळवली. त्याचवेळी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महेश कोठे यांनीही निवडणूक लढवली. त्यांना या मतदारसंघात क्रमांक तीन चे मत मिळाली. म्हणजे या मतदारसंघात महेश कोटी तीन नंबर वर होते. परंतु महेश कोठे यांना जी काही मत मिळाली होती ती त्यांच्या वैयक्तिक कामाची त्यांच्या वैयक्तिक कामाची व स्वतः घडवलेल्या कार्यकर्त्यांची पोच पावती होती.
पूर्वीच्या एकत्रित असलेल्या शिवसेनेला सोलापूर महानगरपालिकेमध्ये दोन अंकी नगरसेवक सुद्धा पाठवत आले नाही. परंतु महेश कोठे यांनी ज्यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी तब्बल 23 नगरसेवक निवडून आणले. सोलापूर महानगरपालिकेमध्ये मानाचा कॅबिनेट दर्जाचा विरोधी पक्ष नेता हे पद त्यांनी शिवसेनेला मिळवून दिल. विधानसभेला पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी शहर मध्य मधून अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप माने यांच्या पेक्षा जास्त मतं घेतली. यावरूनच स्पष्ट होतं की महेश कोठे यांना मानणारा वर्ग त्यांच्या पाठीशी असतो त्यांच्यासोबत असतो.  साहजिकच शहर मध्ये मध्ये शिवसेनेची ताकद असते तर दिलीप माने यांना  किमान दोन नंबर इतकी मत मिळाली असती.
महेश कोठे यांनी शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्यासोबत जवळपास 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महेश कोठे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जवळपास सहा- सात नगरसेवकांनी  शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामध्ये पहिला नंबर मनीष काळजे यांनी लावला. ते नगरसेवक नसले तरी पूर्वीच्या शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे युवा सेना जिल्हाप्रमुखाची जबाबदारी होती. मनीष काळजी यांनी पक्ष वाढीसाठी पूर्वीच्या अनेक शिवसेनेकांना पक्षात आणलं.

मनीष काळजी हे एकनाथ शिंदेंचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी इतर पक्षात प्रवेश करणं म्हणजे काय तरी नक्कीच मोठा षडयंत्र घडला आहे घडत आहे अशी चर्चा शहरात होत आहे. मोठ्या प्रमाणात कुठे साठं लोट होत आहे का? अशी चर्चा चालू आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विद्यमान सदस्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाला सांगोल्याची जागा सुटली आहे. त्या ठिकाणी शहाजी बापू पाटील हे निवडणूक लढवत आहेत. त्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते एक दिलाने महायुतीचं काम करत आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाला हवी होती परंतु युती धर्माचा विचार करता भारतीय जनता पक्षाने ही जागा सोडून दिली आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पुन्हा एकदा लढत आहे व या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात महायुती एकत्रित एक दिलाने लढत आहे. असाच संदेश जनतेपर्यंत जाणं उचित होतं. परंतु शहरातील हे माजी चार नगरसेवक उमेदवारी मिळाली नाही पक्षाला तिकीट वाटपात जागा सुटली नाही म्हणून. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बंड करून थेट छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश करून एका दिवसात विधानसभेसाठी उमेदवारी सुद्धा मिळवली. आता हे आश्चर्यच म्हणावं लागेल. आता या बंडा मागे नक्की शक्ती आणि युक्ती कोणाची आहे. याचा विचार भारतीय जनता पक्षाला करावा लागेल किंबहुना भारतीय जनता पक्ष तसा विचार करत असेल.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, उमेश गायकवाड हे चार माजी नगरसेवकांना हे माहीत असायला हवं की, भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष असून त्यांचे 106 आमदार होते. आणि एकनाथ शिंदे यांचे 50 आमदार होते. तरीही भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांच्यावर झालेला अन्याय पाहून त्यांना न्याय मिळावा म्हणून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवला. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या एकाही आमदाराने नाराजी व्यक्त केली पक्षाचा आदेश म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर सर्वच आमदार कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काम करायचं ठरवलं. बरं ही घटना काही वीस पंचवीस वर्षांपूर्वीची नाहीये. या घटनेचा विसर सोलापूर शहरातील एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडायला नको होता. त्याग आणि एकनिष्ठा काय असते हे देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शिकायला हवं. खरंतर आता महायुतीचा धर्म म्हणून एकनाथ शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसता यावं यासाठी सोलापूर शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून महायुतीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे.
शिवसेना शिंदे गटाच्या सोलापुरातील बंड केलेल्या चार जिल्हाप्रमुखांमुळे महाराष्ट्रात चुकीचा संदेश जातोय. बहुदा यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थान धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण राजकारण
आग लागल्याशिवाय धूर येत नसतो.

मनीष काळजी

अमोल शिंदे

 

उमेश गायकवाड

मनोज शेजवाल

संपादक :-सचिनकुमार जाधव
7385352309

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *