Ajit Pawar had a goodwill meeting with Prakash Ambedkar
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली सदिच्छा भेट
आंबेडकरांच्या निवासस्थानी स्वतः अजित पवार यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले
संपादक:- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309
पुणे दिनांक 07 :-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटी मागचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी अचानक प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे व महाराष्ट्रात चर्चेला उधान आलंय.
प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. आता त्यांची तब्येत बरी आहे 9 नोव्हेंबर पासून ते महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात करणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांना दिली. ही भेट राजकीय नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं शिवाय ते म्हणाले जर राजकीय भेट घ्यायची असती तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशीच भेट घेतली असती. मी फक्त प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच आलो आहे असं अजित पवार म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना काही दिवसापूर्वी छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी गुरुवारी पहाटे 31 ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. यावेळी प्रकाश आंबेडकरांची यशस्वीरित्या अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे.