Strike action of State Excise Solapur Division  

Strike action of State Excise Solapur Division

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई- 3 लाख 33 हजार 300 रूपये चा मुददेमाल व 3 वाहने जप्त.

संपादक :- सचिनकुमार जाधव

📞 📲 738 5352 309 

राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची धडक कारवाई

        सोलापूर दि.7 :- विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये अवैध बनावट विदेशी मदयसाठा व तीन वाहनासह रूपये 3 लाख 33 हजार 300 रूपये चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर , विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर याच्या निर्देशानुसार ,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, उपअधीक्षक एस आर पाटील याचे मार्गदर्शनाखाली दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अक्कलकोट ते नागणअसुर रोडवर नावंदगी फाटयावर नावंदगी गावाचे हददीत ता, अक्कलकोट येथे अवैध विदेशी बनावठ मदयाच्या विविध ब्रॅन्ड च्या 432 बाटल्यासह वाहतूक करणारे एक ॲटो रिक्षा क्र. MH-13 CT – 8221, एक बजाज कावासाकी मोटर सायकल क्र. MH -14/ B –8575 व एक सुझुकी एक्सीस मोटर सायकल क्र. MH-13 / DX -0094 असा एकुण रु 3 लाख 33 हजार 300 रू चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत पाच आरोपीवर पाच आरोपींवर कारवाई करण्यात आली असुन एक आरोपी फरार आहे. त्याचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई निरीक्षक अे. व्ही. घाटगे, जे. एन. पाटील , सुखदेव सिद समाधान शेळके , सहा. दु. निरी. मोहन जाधव, जवान सर्वश्री ईस्माइल गोडीकट, कपील स्वामी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, वाहनचालक रशीद शेख यांनी पार पाडली.

आचारसंहिता कालावधीमध्ये दि. 15 ऑक्टोबर 2024 ते दि. 7 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्हयात अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या सहा ढाब्यांवरती कारवाई करून सहा ढाबा मालक व मद्यपी ग्राहकांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी रूपये 25 हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रुपये 3 हजार ईतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढे अशीच चालू राहणार आहे.

अवैध मद्यविक्री अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *