Congress workers pelted stones at the house of Communist Party candidate Adam Master
कॉम्रेड आडम मास्तरांच्या घरावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली दगडफे
ही बाब समजताच मास्तर प्रचंड संतापले ते म्हणाले माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे
संपादक:- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309
सोलापूर दिनांक – 11 नोव्हेंबर
सोलापुरातील बापूजी नगर येथील कम्युनिस्ट पक्षाचे शहर मध्य चे उमेदवार नरसय्या आडमास्तर यांच्या राहत्या घरावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. दगडफेकीची घटना घडली त्यावेळी अडम मास्तर व त्यांचा परिवार मतदार संघात प्रचार दौऱ्यावर होते. दगडफेक करणारे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुरमेश बुगले विशाल बुगले, गणेश म्हेत्रे या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना सदर बाजार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत हकीकत अशी की ………
सोलापुरातील दक्षिण सदर बाजार येथील बापूजी नगर मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांचं राहतं घर आहे. या ठिकाणी ते आपल्या परिवारासोबत राहतात. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे ते स्वतः व संपूर्ण परिवार प्रचाराकरिता मतदार संघात दौऱ्यावर असतात. दिनांक 11 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता मास्तरांच्या घरावर दगडफेक झाली त्यावेळी ते प्रचार दौऱ्यावर होते. या भागाच्या नगरसेविका कामिनी नरसय्या आडम यांना ही घटना कळतात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अनिल वासन यांना घडलेली घटना फोन द्वारे कळवली. अनिल वासन यांनी तात्काळ आडम मास्तरांचे घर गाठले, त्या ठिकाणी त्यांना प्रचंड गर्दी व बाचाबाची सुरू असल्याचं दिसून आलं.यल्लप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत होते मात्र गुंड प्रवृत्तीचे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमकपणे चवताळून अंगावर येत होते. अनिल वासम यांनी विचारल आमचे नेते आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक का केली ? त्यावेळेस कायदा हातात घेणाऱ्या काँग्रेसच्या गावगुंड वासमला म्हणाले तू कोण कोण आहेस? असं म्हणत अनिल वासन यांना सुद्धा धक्काबुक्की केली. त्यामुळे माकपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तणाव वाढला
घडलेल्या घटनेचे गांभीर्य पोलिसांना फोन द्वारे कळविण्यात आले. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तात्काळ पोलिसांचा ताफा पाठवून परिसरावर ताबा मिळवला व संबंधित दगडफेक करणाऱ्या गाव गुंडांना ताब्यात घेतलं. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा त्यांनी यावेळी सांगितले.
राजकीय पडद्यामागची सत्य घटना………
सन 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर राखीव मतदार संघातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार होत्या. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा दारून पराभव झाला होता. त्यामुळे मुलीचा पराभव टाळण्यासाठी दस्तूर खुद्द सुशील कुमार शिंदे व स्वतः उमेदवार प्रणिती शिंदे शहर जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेत होत्या. त्यातच त्यांनी शहर मध्ये चे माजी आमदार कॉम्रेड मास्तर यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला. याबाबत दिल्लीत सुद्धा चर्चा झाली मान्यता मिळाली. आडम मास्तर यांनी काँग्रेस पक्षाचा म्हणजेच प्रणिती शिंदे यांचा प्रचार करावा पाठिंबा द्यावा त्या बदल्यात आडमस्तरांना विधानसभेच्या सर्वत्रिक निवडणुकीत शहर मध्य मधून काँग्रेस पक्षाकडून जाहीर पाठिंबा दिला जाईल असा शब्द दिला होता.
आडम मास्तर यांनी स्वखर्चाने शहर मध्य विधानसभा त्याचप्रमाणे उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ आदी भागात मिळावे,कॉर्नर सभा प्रभात फेरी, रॅली घेऊन प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला. त्यामुळेच प्रणिती शिंदे यांना निवडणुकीत लीड मिळाला.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मधून आडम मास्तर कॉम्रेड पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. ठरल्याप्रमाणे काँग्रेस नेत्यांने पाठिंबा देणं गरजेचं होतं विशेष करून हे काँग्रेससाठी हिताचे होते. परंतु सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांनी दिलेलं वचन पाळलं नाही दिलेला शब्द पाळला नाही. आडम मास्तरांचा विश्वास घात केला. मास्तरांच्या विरोधात त्यांनी काँग्रेसचा उमेदवार दिला.
आडम मास्तर हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहेत. विश्वासघात झाला ही सल त्यांच्या मनाला लागली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्यावर शाब्दिक बॉम्ब फेकले. प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पैशाचं आमिष दाखवत होतं. पैसे देऊन माणसे विकत घेत होत्या. याचा पर्दाफाश आडम मास्तरांनी केला.
याचाच राग मनात धरून आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे का? असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे.
जनतेने काँग्रेस पक्षाला विचारलेले प्रश्न
वैचारिक लढाईत गांधीजींची काँग्रेस दगडाने उत्तर देऊ इच्छिते का?
प्रचार दौरा संपवून रात्री उशिरा घरी आल्यानंतर आडम मास्तर यांनी सोशल मीडिया द्वारे दिलेली ही प्रक्रिया