Justice Bhushan Gavai Appointed As Executive Chairman Of NALSA

Justice Bhushan Gavai Appointed As Executive Chairman Of NALSA

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्यायाधीश भूषण गवई यांची निवड

सोलापूर, दिनांक 17:-

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  Justice Bhushan Ramkrishna Gavai, Judge of the Supreme Court of India,भूषण रामकृष्ण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण(NALSA) यांच्याकडून देण्यात आली आहे.

Justice Bhushan Ramkrishna Gavai
Justice Bhushan Ramkrishna Gavai

हे नामनिर्देशन आदेश हे 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू आहे. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, यांना विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 च्या कलम 3 च्या खंड (b) द्वारे प्रदान केलेल्या प्राप्त अधिकारांतर्गत सदरचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. त्यासंबंधीची अधिसूचना कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकारच्या अधिकृत राजपत्राद्वारे 08 नोव्हेंबर 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली होती.

भारताचे माननीय सरन्यायाधीश, न्यायमूर्ती श्री.संजीव खन्ना हे NALSA प्राधिकरणचे पूर्वीचे कार्यकारी अध्यक्ष होते. तदनंतर कार्यकारी अध्यक्ष हे पद भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील द्वितीय वरिष्ठ न्यायमूर्तीं यांना बहाल केले जात असते.

NALSA चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन होण्यापूर्वी Justice Bhushan Ramkrishna Gavai, Judge of the Supreme Court  हे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे (SCLSC) अध्यक्ष होते.

 

कार्यकारी अध्यक्ष म्हणून माननीय न्यायमूर्ती Justice Bhushan Ramkrishna Gavai  हे NALSA चे मिशननुसार सर्व नागरिकांना, विशेषतः समाजातील उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व नागरिकांना सुलभ आणि मोफत कायदेशीर मदत प्राप्त व्हावी या NALSA मिशनचे नेतृत्व करतील.

आर्थिक किंवा सामाजिक अडथळ्यांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय नाकारला जाणार नाही याची खात्री करून, कलम 39-A च्या संवैधानिक आदेशाचे पालन करण्याची NALSA ची वचनबद्धता त्यांच्या नेतृत्वात प्रस्थापित केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *