प्रेस फोटो अँड जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप वाडेकर तर सरचिटणीस पदी दिनेश शिंदे

Sandeep Wadekar

सोलापूर : प्रतिनिधी

येथील प्रेस फोटो अँड व्हिडीओ जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी दै. संचारचे संदीप वाडेकर, सरचिटणीस पदी इन न्यूजचे दिनेश शिंदे तर खजिनदार पदी Tv9 चे विनोद हुमनाबादकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात सन 2023-24 साठी वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, सरचिटणीस व पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये उपाध्यक्ष – नितीन कटके, आदित्य केंगार, सचिव – अनिल कांबळे, सहसचिव – तौसिफ शेख, कार्यकारणी सदस्य – इरण्णा जुजगार, नागार्जुन राऊळ, जगन वाघमारे, यशवंत गुरव, मनोज हुलसुरे, सल्लागार – आयुब कागदी, आप्पा बनसोडे, केवल तिवारी, रामदास काटकर, यशवंत सादुल, सलाउद्दीन शेख, वसीम अत्तार, इरफान शेख यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *