A case has been registered for defrauding the temple
श्री खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टची लाखो रुपयांची फसवणूक ; गुन्हा दाखल
संपादक:- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309
सोलापूर दिनांक 14
श्री खंडोबा मंदिर देवस्थान बाळे, सोलापूर या ट्रस्टचे अध्यक्ष व सेक्रेटरी आहे असे भासवून विनय विजय ढेपे व सागर चंद्रकांत पुजारी राहणार दोघेही बाळे यांनी 66 लाख 76 हजार 65 रुपयाची देवस्थान ट्रस्टची फसवणूक केली आहे. याबाबतची तक्रार देवस्थानचे पुजारी, सिद्राम रघुनाथ पुजारी वय 58 वर्ष, राहणार बाळे सोलापूर, यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यात हकीकत अशी की श्री खंडोबा मंदिर देवस्थान बाळे सोलापूर या ट्रस्टचे अध्यक्ष व सेक्रेटरी नसताना, अध्यक्ष व सेक्रेटरी असल्याचे भासवून, कोणताही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे विनय विजय ढेपे व सागर चंद्रकांत पुजारी यांनी देवस्थानकरिता जागा घेण्याचा व्यवहार दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी रजिस्टर खरेदी दस्त क्रमांक 557/23 अन्वये खरेदी दस्त करून जिल्हा मध्यवर्ती बँक बाळे येथील बँक खात्यातून रक्कम रुपये 66 लाख 76 हजार 65 रुपये लिहून देणार व स्टॅम्प ड्युटी करिता खर्च करून उर्वरित रकमेचा लिहून घेणार यांना पुढील तारखेचा चेक देऊन देवस्थानाची फसवणूक केली आहे. अशी तक्रार श्री खंडोबा मंदिर देवस्थानचे पुजारी, सिद्राम रघुनाथ पुजारी यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
दाखल केलेल्या तक्रारीवरून संबंधित आरोपींवर 554/2024 भारतीय दंड विधान 420, 465, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.