ACB arrests corrupt mandal officials
लाचखोर मंडल अधिकारी ACB च्या ताब्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारा संबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क साधावा
संपादक:- सचिनकुमार जाधव
सोलापूर दिनांक 19
करमाळा तालुक्यातील लाचखोर मंडळ अधिकारी शंकर विठ्ठल केकान याने 1000 रुपयाची लाच स्वीकारण्याची संमती दिल्या बाबत, लात लुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागातील अधिकाऱ्याने ताब्यात घेतला आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम सात प्रमाणे करमाळा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
या हकीकत अशी की…
करमाळा तालुक्यातील लासुर मंडल अधिकारी शंकर विठ्ठल केकान वय 55 वर्ष नेमणूक मंडळ अधिकारी कार्यालय केतुर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, राहणार 164 गोविंद बापू नगर जेऊर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर याच्याकडे तक्रारदार यांच्या मुलीचे कुणबी जात प्रमाणपत्र अनुषंगाने प्राप्त कागदपत्रावरून पडताळणी करून अहवाल देण्याकरिता मंडल अधिकारी केकान याने तक्रारदाराकडे 3000 रुपये चे लाच मागितले तडजोडीअंती एक हजार रुपये लाज रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 7 प्रमाणे करमाळा पोलीस ठाणे गुंडा गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे.
यामध्ये मार्गदर्शक अधिकारी म्हणून श्री सरदेशपांडे पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, डॉक्टर शितल जानवे खराडे अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे व पर्यवेक्षक अधिकारी गणेश कुंभार पोलीस उपाधीक्षक लातूर प्रतिबंध विभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई लातलुजपत प्रतिबंध विभाग सोलापूरचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस हवालदार अतुल घाडगे सचिन राठोड गजानन सलीम मुल्ला व चालक सुरवसे गायकवाड सर्वांचे नेमणूक एसीबी कार्यालय सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारा संबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क साधावा
संपर्क पत्ता पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर
दूरध्वनी क्रमांक झिरो 217 231 266 8
टोल फ्री क्रमांक 10 64
या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आला आहे