Action of Anti-Corruption Bureau
लाच स्विकारताना महानगरपालिकेचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात
सोलापूर दिनांक 17मार्च
सोलापूर महानगरपालिकि मुख्य लेखापाल कार्यालयातील कनिष्ठ श्रेणी लिपिक गोपाळ सावरय्या मंदोल्लू पद कनिष्ठ श्रेणी लिपिक यास लाच स्वीकारताना ACB ने रंगेहात पकडले आहे.
यामध्ये सविस्तर हकीकत अशी की मुख्य लेखापाल कार्यालय धनादेश विभाग सोलापूर महानगरपालिका येथे कार्यरत असलेला सेवकाला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गोपाळ सावरय्या मंदोल्लू पद कनिष्ठ श्रेणी लिपिक मुख्य लेखापाल कार्यालय धनादेश विभाग महानगरपालिका सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे बिलाची प्रत देण्यासाठी तक्रारदारास 10 हजार रुपयांची लाच मागत होता. तक्रारदार इसमाने याबाबतची फिर्याद एसीबी कडे केली होती.
गोपाळ सावरय्या मंदोल्लू याने मागितलेले दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.