सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य सगर याने बाजी मारत विजय संपादन केला.
सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सोलापूरसह पंढरपूर, बार्शी, मोहोळ आदी ठिकाणाहून स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा श्रेयश गुरुकुल हायस्कूल, सोरेगाव येथे पार पडली.
या स्पर्धेत उत्कर्ष शीलवंत बॅडमिंटन अकॅडमीचा आदित्य सगर हा खेळाडू 13 वर्षाखालील वयोगटात अंतिम फेरी गाठत पंढरपूरच्या शिवरुद्र मुळे याचा सरळ सेटमध्ये पराभव करून विजयी झाला.
तसेच 17 वर्षे वयोगटांमध्ये श्रिया मिस्किन ही उपविजेती ठरली. या खेळाडूंना उत्कर्ष शीलवंत बॅडमिंटन अकॅडमीचे प्रशिक्षक उत्कर्ष शीलवंत व सह प्रशिक्षक सौ. शुभम यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.