Ajit Pawar | बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार?

Ajit Pawar | एकाबाजूला अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच थेट बारामतीत सभा घेत मोदी सरकारच्या विविध योजनांचाच पाढा वाचला. तर दुसऱ्याबाजूला शरद पवार यांनी अजित पवार यांना उद्देशून केलेलं, ‘पुन्हा संधी द्यायची नसते.’ हे वक्तव्य केलं. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात Pawar Vs Pawar असा वाद रंगला असल्याचे चित्र आहे.

यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील फूट स्पष्ट झाली आहे का? Ajit Pawar यांच्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतीची दारं आता बंद झाली आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

“संधी सारखी मागायची नसते आणि मागितली तरी द्यायचीही नसते,” अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 25 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्याबाबत आपली भूमिका अखेर स्पष्ट केली होती. खरंतर यापूर्वीही अनेकदा Ajit Pawar यांनी शरद पवार यांच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे. इतकंच नाही तर 2019 मध्ये थेट भाजपसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Ajit Pawar पक्षात नाराज आहेत, नॉट रिचेबल आहेत असंही अनेकदा समोर आलं. पण तरीही दरवेळी अजित पवार पक्षात परतले आणि त्यांचं पक्षातलं स्थानही अबाधित राहिलं, हे आतापर्यंत अनेकदा दिसलं आहे. परंतु आता मात्र नजीकच्या काळात तरी असं होण्याची शक्यता कमी आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात. यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया,

Sharad Pawar आणि Ajit Pawar पुन्हा एकत्र येण्याची शक्यता किती?

Ajit Pawar आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी 2 जुलै रोजी युती सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांची अनेक वक्तव्य समोर आली, Ajit Pawar आणि शरद पवार यांच्यात भेटीगाठीही झाल्या. ज्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु Ajit Pawar यांच्या पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत शरद पवार म्हणाले, “पुन्हा संधी द्यायची नसते.”

या वक्तव्याच्या दुसऱ्याच दिवशी Ajit Pawar यांनी बंडानंतर पहिल्यांदाच पवारांचा बालेकिल्ला बरामतीत सभा घेतली. यामुळे आता अजित पवार यांचे परतीचे मार्ग बंद झाले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी Ajit Pawar यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु काही तासातच अजित पवार परतले आणि पक्षाकडूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. शिवाय Ajit Pawar यांच्या नाराजीच्या बातम्याही यापूर्वी अनेकदा आल्या. ते नॉट रिचेबल झाल्याचंही अनेकदा समोर आलं. परंतु अशा कित्येक घटना घडल्या असल्या तरी अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत येतात आणि पक्षातलं त्यांचं स्थानही अबाधित राहतं हे आतापर्यंत दिसलं आहे.

यामुळे यावेळीही पुन्हा असंच काही होईल आणि दोघं एकत्र येतील अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राजकीय वर्तुळात आजही केली जाते. परंतु यावेळी मात्र शरद पवार यांनी पुन्हा संधी द्यायची नसते असं स्पष्टचं म्हटलं.

Sharad Pawar यांनी माध्यमांच्या प्रतिनिधिंना उत्तर देताना म्हणाले, “पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी चर्चेनंतर म्हणाले आमच्याकडून योग्य झालं नाही. योग्य काम झालं नाही. पुन्हा त्या रस्त्याने जायचं नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी द्यावी, म्हणून त्यावेळी निर्णय घेतला होता. पण संधी सारखी मागायची नसते आणि द्यायचीही नसते.”

“त्यांच्या या विधानानंतर तिथं असलेले कार्यकर्ते आणि नेते यांना आता कोणतीही संधीग्धता राहिली नाही असं वाटलं. त्यातल्या काहींनी हे बोलूनही दाखवलं. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांशी बोलताना विशेषतः तरुण कार्यकर्त्यांशी बोलताना हे जाणवत होतं की ते शरद पवारांसोबत आहेत. कारण त्यांना वाटत आहे की, पवारांची भाजपविरोधी भूमिका कायम राहील. पण याचाच अर्थ असाही होतो की, अजित पवारांपेक्षा भाजपविरोध हाच शरद पवारांना पाठिंबा मिळण्यासाठीचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच पवार भाजपालाच आपलं सतत लक्ष्य करत आहेत.”

राज्यात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण रंगलेलं असताना राज्यभरात युती आणि मविआच्या नेत्यांच्या सभा सुरू आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रीय विरोधी पक्षांचीही (INDIA) बैठक मुंबईत होणार आहे. यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पूर्व तयारी सुरू आहे.

एकाबाजूला शरद पवार यांच्या सभा सुरू आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही पक्षबांधणीसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. अशा राजकीय वातावरणात शरद पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून संभ्रम होता आणि त्यादृष्टीने विधानं केली जात होती. परंतु आता शरद पवार आणि अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागेपर्यंत तरी एकत्र येत नाहीत, असं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे.

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण जवळून पाहिलेले राजकीय विश्लेषक सांगतात, “मला वाटतं शरद पवार यांचं हे वक्तव्य वारंवार निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. कारण संभ्रमामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण होत होता. पुन्हा अजित पवार येणार, पुन्हा त्यांचं वर्चस्व असणार आणि त्याला छेद द्यायचा असंही कार्यकर्त्यांना, नेत्यांना वाटू शकतं म्हणून त्यांच्यातील विश्वास वाढवण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे.”

बारामती मतदारसंघ – शेवटचा घाव ठरू शकतो?

पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात नुकतीच अजित पवार यांची सभा झाली. शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार यांची आपल्या बारामती मतदारसंघात ही पहिलीच सभा होती. त्यांनी बारामतीत जीपमधून मिरवणूक काढत मोठं शक्तीप्रदर्शन यावेळी केलं.

यावेळी अजित पवार हे शरद पवार यांच्याविषयी काय भाष्य करतात याची उत्सुकता सर्वांना होती. विशेषत: पुन्हा संधी मिळणार नाही हे पवारांनी स्पष्ट केल्यानंतर आता अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु अजित पवार यांनी यावर काहीही बोलायचं टाळलं.

भाजपचं लक्ष्य बारामती लोकसभा मतदारसंघ आहे हे काही लपून राहिलेलं नाही. पवारांचा बालेकिल्ला भाजपला काबीज करायचा आहे, अशा आशयाची वक्तव्य सुद्धा गेल्या काही काळात भाजप नेत्यांनी केली आहेत.

सप्टेंबर 2022 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बारामती दौरा केला. त्यावेळी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, “2019 च्या निवडणुकांमध्ये अमेठीमधील गांधी कुटुंबाची मक्तेदारी राहुल गांधींच्या पराभवाने संपुष्टात आली. जर आम्ही हे अमेठीत करु शकतो तर हे बारामतीमध्येही आम्ही करु शकतो.”

Ajit Pawar

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. 2009 पासून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्याआधी शरद पवारांनी बारामतीचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातल्या दोनमध्ये राष्ट्रवादीचे, दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तर दोन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार उमेदवार देणार का किंवा युतीच्या उमेदवारासाठी अजित पवार प्रचार करणार का? हे प्रश्न स्वाभाविक आहेत.

“अजित पवार यांची बारामतीमधील रॅली अपेक्षेपेक्षा मोठी झाली. त्यांनी एकदाही शरद पवार यांचा उल्लेख केला नाही. परंतु मोदींवर मात्र ते बोलले. यामुळे पुन्हा एकत्र येण्याबाबत मला वाटतं की यावेळेला लढ्याला तोंड फुटलं आहे. बारामती मतदारसंघ पूर्ण यावर अवलंबून आहे. त्यामुळे बारमतीची लढाई येत्या काळात अधिक टोकदार होत जाईल.”

हेही वाचा

Ajit Pawar News | अजित दादांना हार घालण्यासाठी क्रेनला लटकत आला समर्थक

Hasan Mushrif News | जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष संपवला : हसन मुश्रीफ यांची टीका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *