शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी निधी योजनांसाठी प्रस्ताव सादर करावेत
सोलापूर :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात . सन 2023-24 साठी निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा .
समान निधी योजना सन 2023-24 (Matching Schemes)
इमारत बांधकाम व विस्तार अर्थ सहाय्य योजना : या योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत .
असमान निधी सन 2022-23 (Non Matching Schemes)
1) ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य.
2) राजा राममोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ” ज्ञानकोपरा” विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य व विशेष आधुनिकीकरण अर्थसहाय्य.
3) महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य.
4) राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य,
5) बाल ग्रंथालय व राजा राममोहनरॉय ग्रंथालय “बालकोपरा’’ स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य
राजा राममोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, योजनांबाबत इच्छुकांनी संबधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधकि माहितीसाठी www.rrrlf.gov.in संकेतस्थळ पहावे. अर्जामध्ये नमुद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर या कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई दत्तात्रेय आ. क्षीरसागर, , यांनी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे .