Appointment of Lok Sabha Election Expenditure Inspector
निवडणूक आयोगाकडून सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी तीन निवडणूक खर्च निरीक्षक यांची नियुक्ती
संपादक:- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309
सोलापूर, दि. 25
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान तर दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक यांचे नावे व खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेले विधानसभा मतदार संघ पुढीलप्रमाणे…
के. पी. जयकर
के. पी. जयकर हे केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकारी असून भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यात केलेली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला या तीन विधानसभा मतदारसंघासाठी ते निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून कामकाज पाहणार आहेत. उपरोक्त तीन विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्चाची संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर ती तक्रार 9962452502 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा jeyakar.mz@gmail.com या मेल्वर करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
श्रीमती बी. ज्योती किरण
ह्या केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकारी असून भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यात केलेली आहे. करमाळा, माढा, बार्शी व मोहोळ या चार विधानसभा मतदारसंघासाठी त्या निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून कामकाज पाहणार आहेत. उपरोक्त चार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना निवडणूक खर्चाशी संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर 9022272377 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा exmadha2024@gmail.com या मेलवर करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
मीना तेजराम श्रीमनलाल
हे केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकारी असून भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यात केलेली आहे. सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट व सोलापूर शहर दक्षिण या चार विधानसभा मतदारसंघासाठी ते निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून कामकाज पाहणार आहेत.उपरोक्त चार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना निवडणूक खर्चाशी संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर 9226864982 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा exsolapur2024@gmail.com या मेलवर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.